प्रा. महेश ठेंगरे यांना आचार्य पदवी प्राप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील अहेर नवरगाव येथील महेश ठेंगरी यांनी ब्रह्मपुरी नेवजाबाई हितकारणी कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन लाखांदूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मध्ये प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या दहाव्या दीक्षांत समारंभामध्ये प्रा. महेश ठेंगरे यांना प्राणिशास्त्र विषयात आचार्य पदवी प्राप्त प्रदान करण्यात आली.

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या दहाव्या दीक्षांत समारंभामध्ये मुख्य अतिथी म्हणून भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु तर अध्यक्षस्थानी कुलपती गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तथा राज्यपाल रमेश बैस, कुलपती, विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री, महामार्ग व रस्ते वाहतुक नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर प्रमुख उपस्थिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वने, सांस्कृतिक विभाग व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगट्टीवार, विजयकुमार गावित, डॉ. प्रशांत बोकारे, डॉ. श्रीराम कावळे, यावेळी उपस्थित होते. प्रा. डॉ महेश ठेंगरे यांनी विविध विषयावर डॉ अमीर धमानी प्राचार्य ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर जि. चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात शोधप्रबंध सादर केले. विविध प्रयोग, प्रात्यक्ष्-ि ाक, परीक्षण व वैज्ञानिक मापदंड वापरून तसेच प्राचार्य डॉ अमीर धमानी यांचे उत्कृष्ठ मार्गदर्शन घेऊन सदर शोधप्रबंध तयार करण्यात आले आहे. त्यांच्या यशाबद्दल शैक्षणिक वतुर्ळात कौतुक होत आहे .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *