चुलबंद नदीपात्रात मिळाला महिलेचा मृतदेह

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील आपली येथील गेल्या आठ दिवसापूर्वी घरात झालेल्या भांडणावरून घरातून निघून गेलेल्या त्या वृद्ध महिलेचा अखेर मृतदेहच हाती लागला असून आज २२ सप्टेंबर रोजी चूलबंद नदीच्या चप्राड घाटाजवळ मृतदेह आढळला आहे.सौ.पारबताबाई मारोती करकाडे वय ७५ वर्ष रा. आथली असे मृतक महिलेचे नाव आहे. लाखांदूर तालुक्यातील आथली येथील मारोती करकाडे यांच्या परिवारात घरगुती भांडण झाले .याच दरम्यान घरातील कोणत्याही सदस्याला न सांगता पार्बताबाई करकाडे घरून निघून गेली.कुटुंबीयांनी शोधाशोध केली मात्र काही थांगपत्ता नाही लागल्याने या संदर्भात लाखांदूर पोलिसात तक्रार केली होती.पोलिसांनीही शोधकार्य सुरू केले होते .आज गुरुवारी सकाळच्या दरम्यान चप्राड येथील नावाड्याला एका महिलेचा मृतदेह चुलबंद नदी पात्रात तरंगताना दिसला.

सदर माहिती लाखांदूर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले तोपर्यंत कुटुंबातील अन्य सदस्यांनी पोहचून मृतदेह ओळखले.गेल्या सहा सात दिवसापासून मृतदेह पाण्यात असल्याने कुजलेल्या अवस्थेत मिळाला त्यामुळे जागेवरच वैद्यकीय अधिकाºयाकडून मृतदेहाचा शव विच्छेदन करण्यात आले शव विच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांचा स्वाधीन करण्यात आले. दरम्यान,काही लोकांच्या मते पारबता करकाडे ही भांडणानंतर तावातावाने कपडे धुण्यासाठी चुलबंद नदीच्या आथली घाटावर गेली त्यावेळी तोल न सांभाळल्याने ती नदीपात्रात पडून वाहून गेली. चुलबंद नदीला सतत पुर असल्याने नदी दुथडी वाहत आहे. अशातच पाराबता करकाडे हीचे पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केल्या जात आहे. लाखांदूर पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मडावी ,पोलीस हवालदार लोकेश वासनिक करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *