धाडीतील १.९० लाखांच्या अवैध मुद्देमालाची विल्हेवाट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : तालुक्यातील झिलिमिली येथील अवैध दारु गाळप भट्टीवर ५ डिसेंबर रोजी रात्री धाड टाकून रावणवाडी पोलिसांनी धाड टाकून १ लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्त केले. याप्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झिलिमिली येथे अवैधरित्या मोहफुलाची हातभट्टी लावून दारू गाळणाºया व विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने रात्रीच्या सुमारास धाड टाकून घटनास्थळावरुन ५५ लिटर मोहफुलाची हातभट्टीची दारू, ११६० किलो सडवा मोहफुल रसायन व साहित्य, ६० किलो गुळ, एक दुचाकी असा एकूण १,९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच मोहाफुलाचे रसायन आणि हातभट्टीनिर्मिती साहित्याची विल्हेवाट लावली. याप्रकरणी पर्वत सुरेंद्र श्यामकुंवर, गोविंदा सुरेंद्र श्यामकुंवर, सचिन सुरेंद्र श्यामकुवर रा. परसवाडा यांच्या महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोनि डमाळे, पोलिस अंमलदार चव्हाण, गौरे, गेडाम, चालक इंगळे यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *