‘त्या’ नराधमाला आजन्म कारावास

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या असहाय विधवा महिलेवर अत्याचार करणाºया वासनांध २४ वर्षीय नराधमास जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम अर्जुनी येथे ५ डिसेंबर २०२२ रोजी ही घटना घडली होती. प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.बी. लवटे यांनी गुरुवारी (दि. १४) हा निर्णय सुनावला आहे. राहुल राजकुमार ठाकरे (२४, रा. अर्जुनी-तिरोडा) असे आरोपीचे नाव आहे. सविस्तर असे की, पीडित वृद्ध महिला (६५) ही नेहमीप्रमाणे ५ डिसेंबर २०२२ रोजी शेळ्या चारण्यासाठी शेतात गेली असता आरोपी राहुल ठाकरे याने मागून तिचे तोंड दाबून व ठार मारण्याचीधमकी देत दुपारी १२:३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत अत्याचार केला. यादरम्यान आरोपीने पीडित वृद्धेसोबत अनैसर्गिक कृत्य करून छातीवर व मांडीवर चावा घेतला होता. या प्रकरणात पीडित वृद्धेच्या तक्रारीवरून दवनीवाडा पोलिसांनी भादंवि कलम ३७६ (२), (एम), (एन), ३४१, ३२४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पीडित वृद्धेकडून सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता सतीश घोडे यांनी आठ साक्षीदार मांडले. अखेर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.बी.लवटे यांनीआरोपी राहुल ठाकरे याला या प्रकरणात मरेपर्यंत सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात न्यायालयीन कामकाज आकाश मेश्राम यांनी बघितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *