पिपरी (पुनर्वसन) येथे माता रमाई जयंती साजरी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : नजीकच्या पीपरी (पुनर्वसन) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पिपरी तर्फे त्यागमूर्ती माता रमाई यांची १२५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रिया शहारे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकशाहीर अंबादास नागदेवे, डॉ. देवानंद नंदागवळी, वैशाली सतदेवे, सरोज देशभ्रतार, पी.डी. शहारे, भगवान कातोरे, लीलाधर चवरे, करुणा गजभिये यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरीकरण्यात आली. या प्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या संघर्षमय जीवन कार्यावर प्रकाश टाकला व रमाईच्या जीवनातील अनेक प्रसंगांना उजाळा देऊन प्रत्येकाने त्यांना अपेक्षित असलेला समाज घडविण्याचे आवाहन केले. जयंतीचे अवचित्य साधून याप्रसंगी नवनिर्वाचीत सरपंच देविदास ठवकर, उपसरपंच अरुण चन्ने, सदस्य संतोष कातोरे, संगीता लांडगे, सुषमातितीरमारे, उज्वला शेंडे, उर्मिला निंबार्ते यांचा शाल पुष्पगुच्छ व माता रमाई यांचा जीवन चरित्र पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आले. उपस्थित सर्वांनाही माता रमाई यांच्या जीवन चरित्र पुस्तक भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नाशिक चवरे यांनी केले तर आभार अनिल घुले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कुंदा चवरे, सुजाता चवरे, भारती चवरे, वैशाली चवरे, सुवर्णा चवरे, नितीन मेश्राम, स्वाती चवरे, समीक्षा चवरे, उन्नती चवरे, आर्थिक चवरे, शशिकांत देशपांडे इत्यादींनी परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *