रोड, नालीचे बांधकाम, सांडपाण्याची विल्हेवाट करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी खरबी : मागील २० वर्षांपासून विनोबा नगर, गोवर्धन नगर तामसवाडी रोड येथे अनेक कुंटंूब वास्तव्यास आहेत. पूर्वी घरातील सांडपाणी हे रिकाम्या प्लॉटवर सोडलेले होते परंतु, आता बहुतेक प्लॉटवर बांधकाम सुरू झाले आहे तर काही प्लॉटवर घरे बांधून झालेले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकाना सांडपाण्याच्या त्रास होत आहे. आताच्या घडीला सांडपाणी वाहून जाण्यास कुठेही जागा उरलेली नाही. त्यामुळे सार्वजनिक नालीचे बांधकाम होणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून इतरांना सांडपाण्याच्या त्रास होणार नाही. त्याच बरोबर तामसवाडी रोड व मुख्य रस्त्यावर निघण्याकरिता एकच मुख्य रस्ता आहे व पावसाळ्यात तिथ सुद्धा गैरसोय होते.

तरी लवकरात लवकर नवीन नालीचे व रोड चे बांधकाम करून सांडपाण्याची व्यवस्था करावीअशी मागणी इंजि. नितिन धांडे यांनी केली आहे. मागणीनुसार रा. डी शरणागते, पराग बाणासुरे यांच्या घरापासून ते चौधरी यांच्या घरापर्यंत पक्क्या नालीचे व रोडाचे बांधकाम (सिमेंट काँक्रेट) करण्यात यावे, श्री. रहांगडाले यांच्या घरासमोर,बावनथडी कॉलोनी च्या मागील भागात मुख्य रस्त्यावरच नागरीकांच्या घरातील सांडपाणी जमा आहे, या पाण्याला वाहून जाण्याकरीता पर्यायी व्यवस्था नसल्याने या ठीकाणी डुकर व डासांची हैदास वाढली आहे.

करीता या ठिकाणी पक्क्या नालीची व्यवस्था करावी, बावनथडी रेस्ट हाऊसच्या मागील भागात व मुख्यरस्त्यावर नागरीकांच्या घरातील सांडपाणी जमा आहे. त्यामुळे उपेंद्र सिन्हा यांच्या घराचे प्लास्टर खराब होऊन आत पाणी झिरपत आहे. तरी हे सांडपाणी वाहून जाण्याकरीता पर्यायी व्यवस्था नसल्याने या ठिकाणी डुक्कर व डासांचा हैदास वाढली आहे व त्याच बरोबर संपूर्ण परीसरात दुर्गंर्धी पसरलेली आहे. तरी सदर बाब लक्ष्यात घेऊन यावर तातडीने अंमलबजावणी करून नागरीकांना या त्रासामधुन मुक्त करावे. अशी मागणी इंजि. नितिन धांडे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे नगर परीषद तुमसर यांना केली आहे. यावेळी परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थत होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *