टक्केवारीसाठी अडकवले मानधन, पं.स.समोर संगीतमय धरणे आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानाचे जनजागरण करणाºया जनजागर कलापथक संच एकोडी येथील ठरल्यानुसार कलावंताचे मानधन देण्यास टाळाटाळ करणाºया गटविकास अधिकारी यांचे निषेधार्थ सोमवारी(ता.०३) पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्य ला ७५ वर्ष पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागविण्या करिता,”हर घर तिरंगा” अभियानाच्या प्रचार प्रसाराचे कंत्राट जनजागर कलापथक एकोडी याना देण्यात आले होते. या कलापथकाने लाखनी तालुक्यातील ३५गावात कला पथकाचे कार्यक्रम करून जनजागरण केले होते. शासकीय दरानुसार मानधन मिळण्याकरिता संच प्रमुख मनोज कोटांगले,भावेश कोटांगले यांनी अनेकदा पंचायत समिती कार्यालयात येऊन गट विकास अधिकारी डॉ.शेखर जाधव यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना दिवसभर टाटकळत ठेवण्यात आले असाच प्रकार आठवडा भर सुरु होता केलेल्या कामाचे मानधन मिळत नसल्याने व्यथीत होहून सामाजिक कार्यकर्ता परमानंद मेश्राम, मनोज कोटांगले, भावेश कोटांगले, तिथार्नंद बोरकर, देवानंद उके, दिनेश वासनिक, धीरज गोस्वामी, सुधीर मेश्राम,अस्विनी भिवगडे यांच्या नेतृत्वात ३ सप्टेंबर रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय संगीतमय धरणे आंदोलननाची चेतावणी दिली होती पण गटविकास अधिकाºयाचा आडमुठ्या धोरणामुळे कलावंताचे मानधन दिले गेले नाही त्यामुळे नाहीलाजाने धरणे आंदोलन करण्यात आले अनुसूचित घटना टाळण्यासाठी पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गोसावी,पोलिस नायक पीयूष बाच्चल, संदीप वाघ,नितीन झंझाळ व गृह रक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *