अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : तालुक्यातील इर्री घाटावरुन अवैधरित्या गौणखनिज उत्खनन करुन वाहतूक करणाºया सहा जणांवर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई करीत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ३२ लाख ४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. आव्हाड यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थागुशा येथील पथकाची अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे. यातंर्गत १४ डिसेंबर रोजी रात्रीदरम्यान इर्री परिसरात छापा कारवाई करून अवैधरित्या मुरूम गौणखनिजाचे उत्खनन करून चोरी करणाºयांना पकडण्यात आले. या प्रकरणी जेसीबीराकेश शेंडे (२६) रा. इरीटोला, नरेश तरोणे रा. ईरीर्टोला, सुनील आसोले (४५) रा. ईरीर्टोला, कांतीलाल फरकुंडे रा. कातुली, टिकाराम चौधरी (२२) रा. ईर्री, व योगराज चौरीवार रा. ईर्री यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता ३७९, १०९ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच १ जेसीबी, २ ट्रॅक्टर व २ ब्रास मुरूम असा एकूण ३२,०४००० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. पुढील कार्यवाही गोंदिया ग्रामीण पोलिस करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठाचे मार्गदर्शनात स्थागुशाचे पोनि बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोउपनि महेश विघ्ने, पोहवा भुवन देशमुख, पोशि संतोष केदार यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *