गोंदियातील पानवठ्यांवर विदेशी पक्ष्यांची मांदीयाळी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाºया गोंदिया जिल्ह्यात मध्यम ९, लघु २२ व ३८ जुने माजी मालगुजारी तलाव आहेत. याशिवाय खाजगी, ग्रापंचे व शासनाचे १५०० तलाव आहेत. यापैकी काही जलाशय आणि तलाव परिसरात दरवर्षी हिवाळ्यात विदेशी पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात होते. सध्या जिल्ह्यात या विदेशी पक्ष्यांचे आगमन होण्यास सुरवात झाली आहे. अनेक तलावांवर विदेशी पाहुण्यांची शाळा भरत असल्याचे दृश्य पक्षीप्रेमींना पहावयास मिळत आहे. युरोपीयन देश तसेच मंगोलिया, सायबेरिया परिसरातून विदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात दाखल होतात. जिल्ह्यातील तलाव व पक्ष्यांचे आवडते खाद्य येथे उपलब्ध असल्याने मोठ्या संख्येने विदेशी पक्ष्यांचे आगमन होते. सध्या जलाशयांवर विदेशी पाहुण्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील जलाशयांवर विदेशी पक्ष्यांचा नित्यक्रम मागील अनेक वर्षांपासून कायम आहे. यात कसलाही बदल अथवा खंड पडलेला नाही. दरवर्षी या पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पक्षी निरीक्षक सांगतात.

गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध, नागझिरा, सिरेगावबांध, भुरशीटोला, चूलबंद प्रकल्प, पुजारीटोला, बाजारटोला, परसवाडा, झिलमिली, आमगाव तालुक्यातील नवतलाव, महादेव टेकडी परिसर, झालिया तलाव आणि इतर तलाव परिसरात परदेशी पक्ष्यांचा मुक्काम पहावयास मिळतो. युरोपीयन देशात वाढत्या थंडीमुळे येथे स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरु झाले आहे. अनुकूल वातावरण आणि हवे असलेल्या अन्नाची उपलब्धता लक्षात घेऊन हे पक्षी हजारो मैलांचा प्रवास करीत असतात. नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत या पक्ष्यांचा मुक्काम जिल्ह्यात असतो. तर वसंत पंचमीपासून त्यांचा परतीचा प्रवास सुरु होतो. येथे येणाºया स्थलांतरित पक्ष्यांमध्ये पिटलेस, कॉमन पोचार्ड, व्हाइट आय पोचार्ड, युरेशियन विजन, मलाई गार्गणी, कोंब डक, ग्रेलॉक गुरज, रेड क्रेस्टेड पोचाई, मलाई, गर्गनी, आर्क्टिक टर्न, सायबेरियन स्टॉर्क, ब्लॅकटेलेड गॉडविट, कॉमन डिल, सायबेरियन क्रेन, नॉर्दर्न पिनटेल, ओपन बिल स्टॉर्क ब्लॅक हेड, ब्लॅक हेड एम्बिस, पांढरा स्तन, पट्टे स्टार्क, कामरंट, पॅरामपल मोहन, मार्स हेरियर, युरशियन कलूं, लिटिल स्टट, वॉटर राखाडी बगळा, कमी पंख असलेला गरुड यांचा समावेश असतो.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *