अपयश आले तरीही हरून थकू नका : डॉ. अश्विनी भोंडेकर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : अपयश ही यशाची पहिली पायरी असते. यशाचे शिखर गाठायचे असेल तर अडचणी येत राहतील. पुढे चालत राहाल तर यश नक्कीच हाती लागेल. म्हणून कितीही अपयश आले तरीही हारून न थकता प्रयत्न करत राहायचे आवाहन भोंडेकर शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ अश्विनीताई भोंडेकर यांनी केले. येथील पूजा नर्सिंग महाविद्यालयात आयोजित महिला साक्षमीकरण या कार्यक्रमात त्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना त्य संबोधित करीत होत्या. लायन्स क्लबच्या सेवा दर सप्ताह अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत्या. कार्यक्रमात लायनेस मीनाक्षी साकुरे यांच्या अध्यक्षतेत, भोंडेकर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रमेश चवडे, पूजा नर्सिंग महा-विद्यालयाचे प्राचार्य डॉ दीपक सिंघल, लायन्स क्लब के पदाधिकारी मनोज वंजाणी, झांसी गभणे, सरिता मदनकर, हरिष मदान हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर, सावित्री बाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चित्रांना माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. ज्या नंतर कार्यक्रमाची प्रस्तावना जीवनचंद्र निर्वाण यांनी मांडली.

कार्यक्रमाला संबोधित करतांना डॉ. अश्विनी भोंडेकर म्हणाल्या की मुलींनी शिक्षण फक्त अभ्यासा पुरता सीमित न ठेवता याचा उपयोग अधिकाधिक कसं करता येईल या कडे लक्ष केंद्रित करावे. त्य म्हणाल्या की मुलींनी नर्सिंग चे कोर्स केले असले तरीही त्यांनी नर्सिंग होण्याचा विचार करण्या पेक्षा आपला दवाखानाकसा तयार होवू शकतो आणि त्यात डॉक्टरांना काम कसे देता येईल हे लक्ष केंद्रित करावे. त्यांनी नर्सिंग कोर्सच्या विविध विषयांचे उदाहरण देत स्वत:चे संतुलन जाऊ देवू नका असे विद्यार्थिनींना आवाहन केले. त्यांनी आपल्या भाषणात एलन मस्क सोबतच भारतात होवून गेलेल्या थोर महिलांचे उदाहरण देत स्त्री ही स्त्री ची शत्रू आहे यावर विश्वास नसल्याचे सांगितले. कारण कोणत्याही विद्यार्थिनीला घडवण्यात महिला शिक्षिकेचाही पूर्ण पाठिंबा असतो. ज्या नंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात मीनाक्षी साकुरे यांनी मुलींना वर्तमान परिस्थिति सोबत लढा देत यश कसे मिळविता येईल यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन लायनेस जयश्री बोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन हरिष मदान यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.