किन्हाळा येथे नवरात्र उत्सव जल्लोषात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर: किन्हाळा लाखांदूर येथील स्थापित दुर्गा मातेचे मंदिर असून सार्वजनिक मॉ. दुर्गा शक्तिधाम समिती च्या वतीने नवरात्र दुर्गा उत्सव दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याही वर्षी शक्तीधाम समितीच्या वतीने भक्ताकरीता आकर्षक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. १५आॅक्टोबर रोजी मॉ मंजीगौरी मंदिर रायगडा (ओ-ि रसा) येथील अखंड ज्योत कलश व शोभायात्रा संपूर्ण लाखांदूर शहरात काढण्यात आली. ही शोभायात्रा भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

१६ आॅक्टोबर रोजी आॅल इन वन नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १७ आॅक्टोबर रोजी एकल नृत्य स्पर्धा, १८ आॅक्टोबर रोजी समूह नृत्य स्पर्धा, १९ आॅक्टोबर रोजी भव्य जगराता व संगीतमय समूह प्रस्तुत सुप्रसिद्ध गायिका ईशरत जहॉ यांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम होईल. २० आॅक्टोबर रोजी तेजाब खिलोटे लिखित संगीत ” रुसली साडी माहेरची “या नाटकाचा प्रयोग दाखविण्यात येईल. २१ आॅक्टोबर रोजी महा दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. २२ आॅक्टोबर रोजी भव्य जागरण प्रस्तुत बरखॉ छितरका तर दिनांक २३ आॅक्टोबर रोजी गोपाल काला व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. तरी कार्यक्रमाला उपस्थित राहुन लाभ घेण्याचे आवाहन सार्वजनिक मॉ दुर्गा शक्तिधाम समिती किन्हाळा/ लाखांदूर चे अध्यक्ष उद्योगपती बंटी सहजवाणी, राजू कोयडवा- र, सतीश खरकाटे व समितीचे सदस्य यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *