ट्रॅक्टर पलटल्याने मजुराचा मृत्यू

साकोली : तालुक्यातील ग्राम वडेगाव खांबा परिसरातील शेतशिवारात ट्रॅक्टर पलटल्याने ट्रॅक्टर वर बसलेल्या मजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर ट्रॅक्टर चालक व एक मजूर जखमी झाल्याची घटना आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. राजेश बाबुराव वरकडे वय ३२ वर्ष राहणार वडेगाव असे मृतकाचे नाव आहे. जखमी मध्ये आरोपी ट्रॅक्टर चालक उत्तम पांडुरंग कटनकर वय ४० वर्ष व मजूर रेवचंद किरणापुरे वय ३६ वर्ष यांचा समावेश आहे प्राप्त माहितीनुसार ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३६ डी ८३०० ने ट्रॅक्टर चालक उत्तम कटनकर व दोन मजूर राजेश वरकडे र व रेवचंद किरणापुरे सकाळी दहा वाजता शेत शिवाराकडे भरधाव वेगाने जात असताना चालकाचे ट्रॅक्टर वरून नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटले व यामध्ये राजेश चा घटनास्थळी मृत्यू झाला तर अन्य दोघेही जखमी झाले. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *