समृद्धी मार्गावर पुन्हा भीषण अपघात…१२ ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी संभाजीनगर : महाराष्ट्रात भीषण बस अपघात झाला असून समृद्धी एक्स्प्रेस वेवर प्रवाशांनी भरलेली बस एका कंटेनरला धडकल्याचे वृत्त आहे. या अपघातात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी एक्स्प्रेस वेवर बसची कंटेनरला धडक बसली. अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या खासगी बसमध्ये ३५ प्रवासी होते. रविवारी पहाटे वेगात येणाºया मिनी बसने कंटेनरला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *