चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सोलापूर: पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौºयावर आले असता भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाई फेकून चंद्रकांत पाटील यांना विरोध केला. खासगीकरणचा विरोध करत काळे झेंडे दाखवले. मोठा पोलीस बंदोबस्त असून देखील भीम आर्मीच्या अजय मैनदर्गीकर याने शाई फेकली.स्थानिक पालकमंत्री हवा म्हणून यापूर्वीच चंद्रकांत पाटलांना सोलापुरात विरोध सुरू होता.त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. शासकीय विश्रामगृह येथे छावणीचे स्वरूप आले होते. खुद्द पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र मानेयांनी कडेकोट सुरक्षा तैनात केली होती.मोठी सुरक्षा भिंत तोडून भीम आर्मीच्या अजय मैनदर्गीकर याने शाई फेकली. चंद्रकांत पाटलांचा पांढºया शर्टवर शाई फेकल्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता. पोलीस बंदोबस्त साठीअसलेल्या पोलिसांनी ताबडतोब अजयला ताब्यात घेतले.त्यावेळी त्याच्या हातात काळे झेंडे होते. धनगर कृती समितीचे शेखर बंगाळे हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यासाठी रविवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे आले होते.कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोलापूर पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने स्वत: तळ ठोकून बसले होते.

पोलिसांचा मोठा फौजफाटा शासकीय विश्रामगृह येथे येणाºया प्रत्येकाची कसून चौकशी व झाडाझडती करत होता.धनगरकृती समितीचे शेखर बंगाळे यांनी तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांवर निवेदन देण्याचा बहाणा करून भंडारा उधळला होता. त्यामुळे सावध भूमिका बाळगत सोलापूर पोलिसांनी शेखर बंगाळे आणि त्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.शेखर बंगाळे व त्याचे कार्यकर्ते पोलिसांना समजून सांगत होते,परंतु सोलापूर पोलिसांनी काहीही न ऐकता,चंद्रकांत पाटील शासकीय विश्रामगृह येथे येण्या अगोदर शेखरला ताब्यात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्याकडे नेले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.