राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

उपमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रपरिषदेला संबोधित केले. पुढील वर्षी होणारी लोकसभा आणि राज्यात होणारी विधानसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच लढवणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ शकतो तर मग भाजपासोबत का नाही, असे अजित पवार म्हणाले. महाराष्ट्राच्या हितासाठी हा निर्णय आपण वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच घेतला आहे. यापुढील सर्व निवडणुका राकाँच्या घड्याळ या चिन्हावरच लढणार असल्याचेही सांगितले. देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. मी वर्धापन दिनी स्पष्ट भूमिका मांडली होती. तरुणांना संधी देणे गरजेचे आहे. नवीन कार्यकर्ते पुढे आणले गेले पाहिजे, तसा माझा प्रयत्न राहणार आहे. कोरोनाच्या काळातही विकास हीच आमची भूमिका होती.

केंद्राकडून राज्याला कसा निधी मिळेल, यावर आमचा भर राहणार आहे. बहुतेक आमदारांना माझा हा निर्णय मान्य आहे, असे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही सत्तेत सहभागी झालो आहोत. पुढील निवडणुका पक्षाच्या घड्याळ या चिन्हावरचलढवणार आहोत. नागालँडमध्ये निवडणुका झाल्या, तिथे पक्ष भाजपासोबत गेला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ट्विटरचे प्रोफाईल बदलले उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी आपल्या ट्विटर हॅण्डलचे प्रोफाईल बदलले असून, त्यांनी आपल्या प्रोफाईलमध्ये ह्यउपमुख्यमंत्रीह्ण असा उल्लेख केला आहे. अजित पवारांच्या ट्विटर प्रोफाईलवर राकाँचा झेंडा होता. आता त्यांनी स्वत:चा फोटो आणि बायोमध्ये उपमुख्यमंत्रिपदाचा उल्लेख केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *