स्वामी समर्थ कंपनी उठली नागरीकांच्या जीवावर

दै. भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर सिंगोरी ते मुजवीपर्यंत भंडारा शहराबाहेरून जाणाºया बायपास रस्त्याचे काम सुरू आहे. कारधा येथील टोल नाक्याजवळील पहाडीचे स्वामी समर्थ बिल्डकाँन प्रा.लि. तर्फे रात्रंदिवस खोदकाम सुरू असल्याने महामार्गावर सर्वत्र धुळीचे लोट उडतात. या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून रस्त्यावर साचलेली धूळ वाहन चालकाच्या नाकातोंडात जात असल्याने या मार्गाने प्रवास करणाºयांना मास्क व रूमाल तोंडाला बांधण्याची वेळ आली आहे. धुळीच्या कणांमुळे एलर्जी, सर्दी, खोकला व श्वसनाचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने महामार्गांचे कामही महत्त्वाचे आहे, मात्र नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन ही कामे व्हावी, अशी मागणी होत आहे. कारधा येथील टोल नाका परिसरातील पहाडीचे खोदकाम सुरू असल्याने महामार्गावर सर्वत्र धुळीचे लोट उडतात. या मार्गावर मोठया प्रमाणात वाहतुक होत असून रस्त्यावर साचलेली धुळवाहनाच्या आवागमनामुळे वातावरणात उडते. खोदकाम करतांना त्यावर पाणी टाकणे गरजेचे आहे मात्र बांधकाम करणाºया कंत्राटदाराकडुन याची दखल घेतली जात नसल्याने उडणारी धुळ इतरत्र पसरत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासचे काम जेमतेम सुरू झाले असुन या मार्गावरील कामामुळे सर्वत्र धुळीचे वातावरण पसरले आहे. कारधा येथील जुन्या पुलावरून रहदारी बंद असल्याने दुचाकी,सायकलस्वार याच मार्गावरून ये-जा करीत आहेत. उडणाºया धुळीमुळे महामार्गावरून प्रवास करणे कठीण झाले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *