पोलिस उपनिरीक्षकासह सर्व आरोपी कारागृहात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : मध्यवर्ती कारागृहात तपासणी दरम्यात अंमली पदार्थ आणि मोबाईलच्या बॅटºया मिळाल्यावरून प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मोक्काचा आरोपी सुरेश कावळेसह आठ आरोपींना प्रोडक्शन वारंटवर अटक केले. तसेच बलात्कार प्रकरणात न्यायबंदी असलेला पोलिस उपनिरीक्षक प्रदीपला सुध्दा अटक केली होती. सखोल चौकशीनंतर न्यायालयाच्या आदेशाने सर्वांची कारागृहात रवानगी करण्यात आली. सुरेश कावळे याच्याजवळ गांजा आणि १५ मोबाईलच्या बॅटºया आढळल्या. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्च आॅपरेशनचे आदेश दिले.त्यानुसार शहर पोलिसांनी दोन वेळा तर नागपूर कारागृह प्रशासन आणि पुणे का- रागृहा प्रशासनाकडून प्रत्येकी एकदा कारागृहाची झाडाझडती घेतली. दरम्यानएक मोबाईल तीन बॅटºया मिळाल्या. या प्रकरणी धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा तपास शहर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या तपासात उपनिरीक्षक प्रदीप नितवने याने सूरजचा भाउ सचिककडून पैसे मागितले असल्याचा खुलासा झाला. तसेच सु- रजच्या सांगण्यावरून पोलिसांनी गांजा आणि मोबाईल बॅटºया संबधी दुकानदारांकडून सर्व बिल जप्त केले. तीन दिवसांच्या चौकशी नंतर न्यायालयाने सर्वांची कारागृहात रवानगी केली. सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार अंमली पदार्थ आणि मोबाईलवरून कारागृहात पुन्हा झाडाझडती होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *