भंडाºयात भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवनचरित्र नव्या पिढीला कळावे व त्यांच्या मनातील चित्र बाहेर यावे, याकरिता हिंदवी प्रतिष्ठान भंडारातर्फे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन २४ डिसेंबरला करण्यात आले आहे. तीन गटात ही चित्रकला स्पर्धा होणार असून विद्यार्थ्यांपासून ते सर्व वयाच्या नागरिकांना यामध्ये सहभागी होता येणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जॅकी रॉवलानी आज पत्रपरिषदेतून केले. हिंदवी प्रतिष्ठान, लॉयन्स क्लब भंडारा, भृशूंड ढोलताशा पथक, पतंजली योग समिती, आॅर्ट आॅफ लिव्हींग परिवार, ओबीसी क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. शनिवार २४ डिेसेंबर रोजी सकाळी ९.३० ते १२ यावेळेस नगर परिषद गांधी विद्यालयाच्या मैदानावर स्पर्धा होईल. स्पर्धेत कोणत्याही शाळेतील विद्यार्थी तसेच शहरातील सर्व नागरिक सहभागी होऊ शकता. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र व प्रसंग हा या चित्रकला स्पर्धेचा विषय आहे. याशिवाय भारतातील महापुरूष व राष्ट्रीय नेता, निसर्गचित्र, प्रदूषण,भारतीय उत्सव या विषयांवरही पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना चित्र काढता येणार आहे. स्पर्धेत भाग घेणा-यांना प्रमाणपत्र तसेच उत्कृष्ट चित्र काढणायांना रोख पारितोषिक व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धकांना ड्राईंग शिट देण्यात येणार असून रंगसाहित्य स्वत: आणायचे आहेत. १९ डिसेंबर ही नाव नोंदणीची अंतिम तारीख असून नोंदणीकरिता नवयुवक बूकडेपो, आदीशक्ती मेडीकल स्टोर्स, प्रकाश पांडे, कांचन हटवार, कुमोदीनी हटवार यांच्याशी नोंदणीकरिता संपर्क साधावा. जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. पत्रपरिषदेला जॅकी रॉवलानी यांच्यासह संयोजक प्रकाश पांडे, अरुण भेदे व संजय मते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *