जिल्हा रुग्णालयासमोरील ‘त्या’ खड्डयामुळे अपघाताची शक्यता

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा नगर परिषदेच्या हद्दीतील सामान्य रुग्णालयासमोरील वळणावर असलेल्या मोठ्या खड्डयाकडे नगरपालिका प्रशासनाने सतत दुर्लक्ष केल्याने याची तक्रार विजय क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचेकडे केली. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांना तात्काळ तो खड्डा बुजविण्याचे आदेश दिले. भंडारा शहरातील प्रमुख बसस्थानकाजवळ प्रमुख मार्गावरुन जिल्हा रुग्णालयाचा मार्ग आहे. मेन रोडवरून जिल्हा रुग्णालयासाठी जाणाºया या प्रमुख चौकात दिवसरात्र अतिवर्दळ व वाहनांची ये-जा असते. शहराच्या प्रमुख मार्गावरून जिल्हा रुग्णालयात दिवसरात्र रुग्णवाहिका वेगाने धावत असतात.

मागील वर्षी नगर परिषदेने या मार्गाची दुरुस्ती केली. मात्र नाले बांधकाम अर्धवट ठेवले. या वर्दळीच्या चौकात वळणावर मोठा खड्डा निर्माण झाला. या खड्डयामुळे केव्हाही अपघात होण्याची शक्यात नाकारता येत नाही. असे असतानाही नगर परीषदेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने विजय क्षिरसागर यांनी याची तक्रार जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचेकडे केली. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी नगर परीषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांना तात्काळ तो खड्डा बुजविण्याचे आदेश दिले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.