वाहनाच्या धडकेत बिबट ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : भंडारा वनविभागातील वनक्षेत्र भंडारा सहवनक्षेत्र कोका, नियतक्षेत्र कबलेबाडा, अंतर्गत मोना गडेगाव येथील कक्ष क्र. १७० राखीव बनालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ येथे एक मादी बिबट अंदाजे वय ०४ ते ०५ वर्ष अज्ञात वाहनाच्या धडकेत मृतावस्थेत आज दि. २०/०७/ २०२३ रोजी अंदाजे पहाटे ३.३० वाजता आढळून आले. सदर घटनेची माहिती राष्ट्रीय महामार्ग गस्ती पथकाकडून प्राप्त होताच, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे, वनपाल आर. बी. धारणे, बीटरक्षक व्ही. के. नेवारे व अजय उपाध्ये, इतर वनकर्मचारी तात्काळ घटना स्थळी दाखल झाले व घटनास्थळाचा मौका पंचनामा नोंदवून मृत मादी विवटाचे शरीर ठळउअ च्या रडढ कार्यपद्धतीनुसार शवविच्छेदन करावयाचे असल्याने गडेगाव वनआगार येथे हलविण्यात आले.. त्यानंतर उपवनसंरक्षक राहुल गवई, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली गडेगाव वनआगार येथे पशुधन विकास अधिकारी डॉ गुणवंत भडके, डॉ.एस.एफ.निपाने डॉ. विठ्ठल हटवार, डॉ.एल.पी. देशमुख, यां पशुधन विकास अधिकाºयांच्या चमूने तसेच एनटीसीचे प्रतिनीधी म्हणून मानद वन्यजीव रक्षक शाहिद खान व नदीम खान यांच्या उपस्थितीत सदर मृत मादी बिबटयाचे एनटीसीए च्या रडढ कार्यपद्धती मार्गदर्शक सुचनेनुसार शवविच्छेदन करण्यात आले. पशुवैद्यकिय अधिकारी यांच्या चमुच्या अहवालानुसार सदर मृत मादी बिबटयचे रस्ते अपघातामुळे मृत्यु झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शवविच्छेदनानंतर मृत शरीराचे दहन करण्यात आले आहे. सदर कार्यवाही दरम्यान भंडारा वनविभागातील इतर वन अधिकारी व वनकर्मचारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *