बकºया चोरट्यांची आंतरराज्य टोळी गजाआड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : बकरी चोरीच्या तीन प्रकरणाच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने बकºया चोरट्यांच्या आंतरराज्य टोळीतील चौघांना अटक केली. त्यांच्याकडून ३ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तालुक्यातील टिकायतपूर येथे १२ जुलै रोजी रामेश्वर बिसेन यांच्या ७ व अनमोल लिल्हारे यांच्या १६ बकºया चोरी गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गंगाझरी पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. तर १३ जुलै रोजी दवनीवाडा पोलिसांनी सालईटोला येथील विजय उईके यांच्या तक्रारीवरुन बकºया चोरीचा गुन्हा दाखल केला होता. तसेच आमगाव तालुक्यातील मानेगाव येथे ७ जुलै रोजी लोकचंद मरसकोल्हे यांच्या १२ बकºया अज्ञात व्यक्तीने चोरी केल्या होत्या. याप्रकरणी आमगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, वाढत्या बकरी चोरीच्या घटना गांभीयार्ने घेत पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे व अप्पर पोलिस अधीक्षक श्री. अशोक बनकर यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलिस पथकाने तपास सुरु केला. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी युनुस ऊर्फ साबीन आर्यन खान (२२) रा. बडेगाव म.प्र., गोलू ऊर्फ अमिर मुबारक हुसैन (३५), जावेद मुबारक हुसेन (३५) व राजा शफीक शेख (२२) तिन्ही रा. बापूनगर छ.ग. यांना ताब्यात घेतले. त्यांनी तिन्ही गुन्हयाची कबुली दिली असून भंडारा जिल्ह्यातील लाखनी, साकोली येथे सुध्दा बकºया चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल करून विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ३९ हजार ५०० रोख एक चारचाकी गाडी असा ३ लाख ८९हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जपत केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पथकातील सपोनि विजय शिंदे, पोउपनि महेश विघ्ने, पोहवा तुलसीदास लुटे, दीक्षित दमाहे, धनंजय शेंडे, पोशि संतोष केदार, अजय रहांगडाले, चापोशि विनोद गौतम, कुंभलवार यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.