अखेर मजीतपूर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक निलंबित

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- महाराष्ट्र राज्यात डोंगराळ व दुर्गम भागात राहणा-या अनुसूचित जमातीचे सामाजिक व शैक्षणिक प्रगती होण्यासाठी सन १९७२-७३ पासून क्षेत्रविकासाचा दृष्टीकोन स्विकारण्यात आला अशा भागाचा मूलभूत विकास व्हावा आणि त्याचा फायदा सर्वांना व्हावा यासाठी तेथे मूळ केंद्रस्थान म्हणून आश्रमशाळा आसावी या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना इ. १२ वी पर्यंतच्या शिक्षणाची महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आलेली आहे गोंदिया जिल्ह्यातील मजीतपुर येथे आदिवासी विभागाची माध्य. व उच्च माध्यमिक निवासी आश्रम शाळा नियमितरित्या सुरु असून सत्र २०२२२३ मध्ये विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा याकरिता दिनांक २२ सप्टेंबर ते २४ सप्टेंबरपर्यंतआदिवाशी आश्रम शाळा येथे क्रिडा स्पधेर्चे आयोजन करण्यात आले होते.

व या क्रीडा स्पर्धेकरिता मजीतपूर येथील एकूण उच्च माध्यमिक गटातील १२० विद्यार्थी सहभागी झाले असून या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांची संपूर्ण जवाबदारी हि मुख्याध्यापक व संबधीत क्रिडा शिक्षकाची होती परंतु मजीतपूर येथील मुख्याध्यापक एस.के.थूलकर आपल्या कर्त्यव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आले सहभागी विद्यार्थ्यांना ने-आन करण्याकरिता बसची सुविधा करणे गरजेचे होते परंतु मुख्याधापका तर्फे बसची सुविधा न पुरविता खाजगी मिनी मालवाहक (४०७) करण्यात आले व दिनांक २४ सप्टेंबर ला क्रिडा स्पर्धा संपताच या १२० विद्याथ्यार्नाया मालवाहकामध्ये जनावरांप्रमाणे कोंबून आणण्यात आले असल्याने विद्याथ्यार्ना प्राणवायूची कमतरता जाणू लागली व एकोडीजवळ १० विद्याथ्यार्ची प्रकृती खालावल्याने तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करण्यात आले त्यापैकी एका विद्यार्थिनीला गोंदिया येथे उपचाराक-ि रता दाखल करण्यात आले सदर प्रकरणाची माहिती लागताच तिरोडा गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले यांनी तातडीने आश्रम शाळेत भेट देऊन हलगर्जीपणा करणा-या दोषी शिक्षकांवर कार्यवाही करण्याबाबत आदिवासी विभाग अप्पर आयुक्त यांना आदेश दिले असता अवघ्या अर्ध्या तासात अप्पर आयुक्त यांनी आमदार महोदयांच्या तक्रारीनुसार मुख्याध्यापक एस.के.थुलकर यांना निलंबित केले आहे.

मजितपूर घटनेच्या चौकशीचे पालकमंत्री मुनगंटीवार यांचे आदेश

गोंदिया:- मजितपूर, ता. गोंदिया येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा ट्रकमध्ये बसून प्रवास या घटनेची गंभीर दखल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली असून या घटनेच्या चौकशीचे दिले आहेत. त्याच बरोबर जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विद्यार्थ्यांना तात्काळ उपचार मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणा-या मजितपूर ता. गोंदिया येथील आश्रम शाळेतील विद्यार्थी क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी कोयलारी येथे गेले होते. स्पर्धा संपल्यानंतर परतीचा प्रवास ट्रकमधून केल्यामुळे काही विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागल्याचे वृत्त माध्यमात प्रसारित झाले. या घटनेतील विद्यार्थ्यांना उपचारासाठी एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. या वृताची तात्काळ दखल पालकमंत्र्यांनी घेतली असून घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांवर तात्काळ उपचार करावे असे आदेश त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून दिले. पालकमंत्री स्वत: यावर लक्ष देत आहेत. या घटनेची सविस्तर माहिती त्यांनी संबंधित अधिका-यांकडून घेतली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *