पोस्टर विक्रेत्यांच्या आयुष्यातील रंग हरवला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : कधीकाळी घराच्या भिंतींची शोभा वाढविणारे पोस्टर आज तंत्रज्ञानाच्या युगात कालबाह्य झाले आहेत. आज पोस्टर विक्रीचा व्यवसाय करणाºया हातांना डिजिटल वॉलपेपरने पंगू केले आहे. त्यामुळे अशा विक्रेत्यांसमोर रोजीरोटीची व्यवस्था करण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. पूर्वी घरांना भिंती जरी कुडाच्या व कच्च्या विटांच्या असल्या तरी, बैठक खोलीतील भिंतींची शोभा रंगीबेरंगी पोस्टर करायचे. रंगीबेरंगी फुले, गुलदस्ते, आपले आवडते अभिनेते, पक्षी, निसर्ग, तलाव, धबधबे यांची मनमोहक चित्र घरांच्या भिंतीवर लावून अनेक शौकीन बैठक खोलीची सजावट करायचे. आज बदलत्या युगात लोकांनी सिमेंटची घरे बांधली. घरांच्या भिंती बदलल्या आणि त्यांना सजावट करण्याच्या पद्धतीतही बदल झाला आहे. यामुळे पोस्टर विक्रेत्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोहाडी तालुक्यातील करडी येथील नत्थु फाये (वय ५०) वडिलांना घर चालविण्यात हातभार लावण्यासाठी लहानपणापासूनच मंडई, जत्रा, आठवडी बाजारात पोस्टर विकण्याचा व्यवसाय करीत आहेत. त्यांचे वडील वारल्यानंतर घराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. लग्न झाले, कौटुंबिक विस्तार झाला. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. ते पोस्टर खरेदीसाठी नागपूर-गोंदिया येथील बाजारात जातात. पोस्टर खरेदी करून ठिकठिकाणी फिरून आपल्या परिवाराचा गाडा हाकण्यासाठी सतत धावपळ करत आहेत. मात्र, आॅनलाईन वालपेपरच्या काळात त्यांचे पोस्टर विक्री कमी झाली आहे. त्यामुळे अर्ध बेरोजगारीचा सामना या व्यवसायतील विक्रेत्यांना करावा लागत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *