एसडीओंमुळे त्या विद्यार्थिनीचा अभियांत्रिकीचा प्रवेश सुकर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी चंद्रपूर : प्रशासकीय दप्तर दिरंगाईचा फटका नवा नाहीच. परंतु, कधी-कधी सरकारी अधिकारी व कर्मचाºयांच्या कर्तव्य तत्परतेमुळे एखाद्याचे भविष्य उजाळते. असाच अनुभव चंद्रपुरातील स्नेहलला आला. चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांच्यामुळे स्नेहलचा अभियांत्रिकीमध्ये प्रवेश सुकर झाला. वडगाव प्रभागातील वडगाव या जुनी वस्ती परिसरातील स्नेहल भोयर ही एका अल्पभूधारक शेतकºयाची मुलगी आहे. तिने रामटेकच्या कवी कुलगुरू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड सायन्समध्ये इलेक्ट्रॉनिक शाखेत प्रवेश मिळाला. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या आत ‘नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र’ जमा करा, नाहीतर मागासवर्गीय प्रवगार्तून प्रवेश रद्द होणार असे तिला महाविद्यालय प्रशासनाकडून कळविण्यात आले. शनिवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे व खुल्या प्रवर्गातील शैक्षणिक शुल्क भरणे शक्य नसल्यामुळे स्नेहलच्या पालकांसमोर मोठे संकट उभे राहिले. त्यांनी जनविकास सेनेचे अध्यक्ष वडगाव प्रभागाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. देशमुख यांनी दुपारी १.३० च्या दरम्यान चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला. सुट्टीच्या दिवशी बाहेरगावी असतानाही त्यांनी देशमुख यांना व्हाट्सअपवर स्नेहलने केलेल्या अर्जाची पावती व इतर सर्व माहिती मागवून घेतली. दुपारचे २.३० वाजल्यामुळे स्नेहलच्या पालकांबरोबरच देशमुख यांची धाकधूक वाढली. मात्र दुपारी २.४० वाजता उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी देशमुख यांच्या व्हाट्सअपवर नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र पाठविले आणि त्या विद्यार्थिनीला ते प्रमाणपत्र पाठविण्याचा निरोप दिला. त्यांच्या या कर्तव्यतत्परतेमुळे स्नेहलचा अभियांत्रिकीचा प्रवेश सुकर झाला. विद्यार्थ्यांना नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्राची गरज असल्याचे मुरुगानंथम एम. यांना कळताच त्यांनी स्नेहलबरोबरच इतर सुमारे ५० विद्यार्थ्यांच्या प्रकरणाचा आॅनलाइन पध्दतीने तातडीने निपटारा केला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *