प्रभातफेरीमुळे भक्तीमय झाले चांदणी चौक परीसर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : सार्वजनिक हनुमान मंदिर पंच कमेटी देवस्थान यांच्या वतीने चांदणी चौक, सागर तलाव भंडारा येथे कार्तीक मास समाप्ती निमित्त मंगळवार दि. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजतापासून प्रभातफेरी, दुपारी २.३० वाजता गोपालकाला दहीहांडी तसेच सायंकाळी ६ वाजतापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभातफेरी चांदणी चौक, हनुमान मंदिरापासून मोठा बाजार मार्गे मेन रोड गांधी चौक नंतर सागर तालावाजवळ समापन करण्यात आले. प्रभातफेरीदरम्यान बच्चे कंपनींनी राम, लक्ष्मण, सिता, हनुमान व श्रीकृष्णाची वेषभुशा साकारली होती. या प्रभातफेरीमुळे चांदणी चौक परीसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यामध्ये भजन मंडळींचीही उपस्थिती होती. या दरम्यान विविधांगी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी परीसरातील नागरिकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कमेटीचे अध्यक्ष क्रिष्णा हेडाऊ, उपाध्यक्ष योगेश हेडाऊ, सचिव नाना न्यायखोर, श्विचरण दुधपचारे, क्रिष्णा उपरीवर, मनोहर हेडाऊ, मारोती मोहनकर, उमेश धकाते, वामन धकाते, गणेश निनावे, ललीत जांबुळकर, किशोर हेडाऊ, उमेश हेडाऊ, बालु आंबिलकर, निळावंती निमजे, रेणू निपाणे, प्रमिला लिमजे, प्रमिला निनावे, इंदू खेताडे व नलिनी कुंभारे यांनी अथक प्रयत्न केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.