भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील अनुभव समृद्ध करणारा:- राहुल गांधी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी जळगाव जामोद : भारत जोडो यात्रेला महाराष्ट्राच्या जनतेने अपार प्रेम दिले, आमच्यावर विश्वास दाखवला. १४ दिवसात महाराष्ट्राकडून खूप काही शिकायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या भूमीने मला दिलेला अनुभव समृद्ध करणारा आहे असे उद्गार काँग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी यांनी काढले. बुलढाणा जिल्ह्रातील आजच्या शेवटच्या सांगता निमखेड येथे झाली. यावेळी राहुलजी म्हणाले की, या पदयात्रेदरम्यान महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण, महिला, दलित, वंचित विविध समाज घटकांचे लोक भेटले, त्यांनी त्यांच्या समस्या, वेदना, व्यथा सांगितल्या. देशातील सध्याच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीसंदर्भातही लोक बोलले, विविध संघटना, संस्थांचे प्रतिनिधी, विचारवंत भेटले , त्यांनी दिलेली माहिती माज्यासाठी महत्वाची आहे. महाराष्ट्राकडून मिळालेला हा अनुभव मी कधीच विसरणार नाही. असे म्हणून राहुल गांधी यांनी सर्वांचे आभार मानले व शेवटी ‘जय महाराष्ट्र’ म्हणून भाषण संपवले. भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील निमखेड येथे छकॠऌळ डऋ वठकळ चा भव्य सुंदर लाईट शो आयोजित करण्यात आलेला आहे. सर्वधर्मसमभावाचे दर्शन याव लाईट शो मधून दाखवण्यात आले. भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील चौदाव्या व शेवटच्या दिवशी पदयात्रा सकाळी भेंडवळ येथून सुरू झाली आणि दहा वाजता जळगाव (जामोद) येथे पोहोचली. संध्याकाळी यात्रा मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत गेली. आजचा मुक्काम निमखेडी येथे असून पुढे ही यात्रा बुहाणपूर या मध्य प्रदेशातील शहराच्या वेशीवर दाखल होईल.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *