माहेश्वरी साल्वेट एक्सटेंशनच्या संचालकाविरुद्ध गुन्हा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : ग्रमीण पोलिस ठाणे हद्दितील खमारी येथील माहेश्वरी साल्वेट एक्सटेंशन लि. च्या संचालकाविरुद्ध फसवणूक प्रकरणी पुन्हा तीन कामगारांनी गुन्हा दाखल केला आहे. कामगारांनी सांमजस्यातून मार्ग निघत नसल्यामुळे कर्मचाºयांनी संघटनेच्या माध्यमातून कामगार न्यायालय भंडारा येथे दाद मागितली. न्यायालयाने कामगारांची बाजू घेत कंपनीच्या संचालक मंडळाला थकीत वेतनाचे २ कोटी ५५ लाख रुपये देण्याचे निर्देश दिले. न्यायालयाच्या आदेशान्वये कंपनीच्या संचालकांनी न्यायालय समक्ष कामगारांना दोन हप्त्यामध्ये थकीत वेतन देण्याची कबुली दिली.मात्र, कामगारांना दिलेले धनादेश कंपनीच्या बँक खत्यात पैसे नसल्याने वटले नाही. या प्रकरणात संचालकाकडून न्यायालय, कामगार उपायुक्त आणि कामगारांची उघडपणे फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. यामुळे गेल्या काही दिवसांपासून पीडित कामगारांनी पोलिसांकडे धाव घेतली. सातत्याने प्रत्येक कामगाराकडून दोन्ही संचालकाविरुद्ध गोंदिया गह्यामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात आहे. त्यातच ९ डिसेंबर रोजी ३४ कामगारांनी गुन्हे नोंद केल्यानंतर १० डिसेंबर रोजी पुन्हा तीन कामगार फिर्यादी लिखीराम सखाराम मुनेश्वर (५१) रा. खमारी, रामदास ग्यानिराम येरणे (५७) रा. दहेगाव व इतर एक यांच्या तकह्यारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.