अवैध वाळू उत्खनन प्रकरणी १.३५ कोटीचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : तालुक्यातील मुर्दाड घाट वैनगंगा नदीपात्रातून वाळूचे अवैधरित्या उत्खनन करणाºया ६ जणांविरुद्ध दवनीवाडा पोलिसांनी १४ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी २ पोकलैंड मशीन, १ दहाचाकी टिप्पर व ५ ब्रास वाळू सह १,३५,१५,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. वैनगंगा नदीच्या मुदार्डा घाट पात्रातून काही लोक विनापरवाना वाळूचे उत्खनन करून गौण खनिजाची चोरी करीत असल्याची माहिती दवनीवाडा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी तिरोडा प्रमोद मडामे यांच्या नेतृत्वातीलदवनीवाडा पोलिस पथकाने छापा टाकला. या कारवाईत टिप्पर क्र. एमएच ३५, एएच ९२९२ चा चालक राजू मनोहर डहारे (३७) रा.खुर्शीपार याच्यावर, पोकलैंड मशीन चालक घनशाम कन्नयालाल डहाके (३६) वर्ष, रा. वाकडी, पोकलँड मशीन चालक मनोजकुमार सुमिरन यादव (२३) रा.दादरीकला तसेचच अन्य एक टिप्पर व दोन पोकलँड मशिन मालकांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीकडून १,३५, १५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध वाळूसाठा व उत्खननाकरिता व वाळू चे वाहतुकी करिता वापरलेली वाहने जप्त केली आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक, अशोक बनकर यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी तिरोडा प्रमोद मडामे यांचे नेतृत्वात ठाणेदार राहुल पाटील, पोहवा भुरे, बघेले, पोशि हर्षे, शेंद्रे यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.