अवैध गुटखा पकडला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी आर्णी : पोलिसांनी धडक कारवाई करित शुक्रवार, १६ डिसेंबर रोजी पहाटे ४८ लाख ६० हजाराच्या ४३ ‘ँं २ी्र९ी िगुटख्यासह 68 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. छत्तीसगढ येथून हदगाव, जि. नांदेड येथे अवैध गुटखा जात असल्याची गोपणीय माहिती पोलिसांना मिळाल्याने राष्ट्रीय महामार्गावरील महाळूंगी पॉईंटवर सापळा रचून यवतमाळकडून हदगावकडे जाणारा लाल रंगाचा टाटा आयशर कह्यमांक सीजी ०८ एएन ६१०७ या वाहनास थांबवले. वाहनाची तपासणी केली असता. या वाहनात सितार गुटखा किंमत ४८ लाख ६० हजार व टाटा आयशर वाहन किंमत २०लाख असा एकूण ६८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल आढळून आला. २ी्र९ी िमुद्देमाल जप्त करून वाहनचालक व वाहन क्लिनर या दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई आर्णी पोलिसांनी शुक्रवारी पहाटे 2.45 केली. ही कारवाई ठाणेदार पितांबर जाधव, पोलिस उपनिरिक्षक किशोर खंडार, जमादार मनोज चव्हाण, संजय भारती, अरूण पवार, मिथुन जाधव यांनी केली. अवैध गुटखा कारवाईची माहिती यवतमाळ येथील अन्न औषध प्रशासन अधिकारी धनश्याम दंडे यांना देण्यात आली. धनश्याम दंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वाहन चालक सरबनसिंह मुखत्यार सिंह (वय 49) रा. सिकोला बस्ती दुर्ग ता.जि. दुर्ग (छत्तीसगढ) व वाहन क्लिनर अब्दुल गफार मोहंमद अली (वय 48) रा. जगमोहन नगर दुर्ग, ता. जि. दुर्ग (छत्तीसगढ) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *