भंडारा नगर परीषद तर्फे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त भव्य प्रभात फेरी !

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : सावित्रीबाई फुले जयंती निमित्त हुतात्मा स्मारक शास्त्री चौक भंडारा येथून प्रभात फेरी आयोजित करण्यात आली प्रभात फेरीला नगर परिषद चे प्रशासक तथा मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी शुभेच्छा व हिरवी झेंडा दाखऊन सुरुवात केली. अठराव्या शतकात जेव्हा स्त्रीसाठी फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरतेच क्षेत्र तीचे मर्यादित होते. त्यावेळी सावित्रीबाई फुले यांचे त्याग व कठोर परिश्रमाने व स्त्रियांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाच्या कार्यमुळेच आज समाजामध्ये महिलांना मानाचे स्थान मिळाले आहे असे प्रतिपादन मुख्याधिकारी तथा प्रशासक विनोद जाधव यांनी केले. ज्ञान ज्योती सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग पन्नास वर्षे लोकांच्या कल्याणासाठी राबत होत्या. सेवा आणि कल्पनेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला. शिक्षण, स्त्री- पुरुष समानता, या विषयांचे पुरस्कार सावित्रीबाईने केला. सावित्रीबाई यांचे जिद्द, चिकाटी, विचार व कार्य यांची प्रेरणा घेऊन बचत गटातील महिलांनी कार्य करावे व सक्षम व्हावे असे प्रतिपादन नगर परिषदेचे प्रकल्प संचालक प्रविण पडोळे ह्यांनी केले. सदर प्रभात फेरी मध्ये शुसोभित देखावे तयार करण्यात आले. त्या देखाव्यांमध्ये सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांचे वेश धारण करून मुलांना शिक्षण देत असल्याचा देखावा सादर करण्यात आले.

हुतात्मा स्मारक येथून प्रभात फेरीची सुरुवात होऊन गांधी चौक येथे आली असता प्रभात फेरीला स्वागत मा. खासदार श्री. सुनील मेंढे, नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विनोद जाधव, ह्यांनी प्रभात फेरीतील ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले ह्यांचे पुष्प हार अर्पण करून केले. या प्रसंगी अश्विनी चव्हाण, मुकेश कापसे,अतुल पाटील, प्रकाश बांते, परमवीर सिंग राठोड, बाळकृष्ण लांजेवार, अंकुश गजभिये तसेच नगर परिषदेचे सर्व अधिकारी / कर्मचारी व गणमान्य नागरिक उपस्थित होते. प्रभात फेरी मध्ये१००० महिलांचा सहभाग होता. त्यानंतर प्रभात फेरी मुख्य मार्गाने पोस्ट आॅफिस चौक, मुस्लीम लायब्ररी चौक, आधार शहर उपजीविका केंद्र मिस्कीन टंक गार्डन येथे प्रभात फेरीचे समापन झाले. व त्यानंतर सर्व उपस्थित महिलांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव निमित्य मान्यवरांचे मार्गदर्शन झाले ह्यांच्या जीवनावर विविध माहिती सांगून तसेच वेगवेगळ्या प्रकारचे गीत गायनातून महिलांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान शहर अभियान व्यवस्थापन कक्षाचे उषा लांजेवार, रेखा आगलावे, रंजना साखरकर, शायना खान, समिता भंडारी, प्रियंका सेलोकर, ज्योती राऊत, सीमा साखरकर, नंदा कावळे, महानंदा बसेशंकर, साजेद खान, सुनिता बारापात्रे, कोमल साखरकर, रंजना गौरी, आशा चकोले, संगीता रोडे,लता डोरले पोर्णिमा बारापात्रे, कोमल सोनटक्के, भावना बोरकर, सुरेखा शेंडे,आशा झाडे, प्रियंका नागपुरे, व इतर स्वयं सहायता महिला बचत गट, वस्ती स्तर संघ, शहर स्तर संघ तसेच समुदाय संसाधन व्यक्ती तसेच आधार शहर उपजीविका केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *