सत्तेत असताना स्वप्नातील शहर घडविण्याची ध्येय पूर्ती झाल्याचे समाधान : प्रदीप पडोळे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहरात सध्या तुमसर नगर परिषदेवर प्रशासक विराजमान आहेत. मात्र सत्तेत असताना स्वप्नातील शहर घडविण्याची ध्येय पूर्ती झाल्याचे समाधान माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी व्यक्त केले आहे. नगराध्यक्ष असताना कोरोनाचा कठीण काळ वगळता हाती मिळालेल्या फावल्या ३ वर्षात तुमसर शहरात अनेक महत्त्वाची विकास कामे पार पडली. यात प्रभागांना जोडणारे मुख्य रस्ते, घरकुल, समजिक व सांस्कृतिक भवन तसेच शालेय इमारतीचे बांधकाम यांचा प्रमुख समावेश आहे. या व्यतिरिक्त अख्ख्या जिल्ह्यात वास्तूचे उत्तम उदाहरण ठरणारी नगर परिषदेची प्रशासकीय इमारत देखील पडोळे यांच्या कारकिर्दीत पूर्णत्वास आली होती. त्याच शहर विकासात भर घालणारे अत्याधुनिक सुसज्य वाचनालय पूर्णत्वास आले आहे. तब्बल १ कोटी ८० लक्ष रुपये खर्चून डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे ती वास्तू तयार करण्यात आली आहे. सर्व भौतिक सुविधांनीसज्ज हे वाचनालय जिल्ह्यातील एकमेव ठरणार असल्याचे दिसत आहे.

पडोळे यांच्या कारकीर्दीत शिक्षण क्षेत्रात देण्यात आलेला भर ऐतिहासिक ठरल्याचे ह्या वाचनालयाच्या बांधकामातून दिसत आहे. यातून अनेक शैक्षणिक पिढ्या घडविण्यात नक्कीच मदत होणार असल्याची भावना पडोळे यांनी व्यक्त केली आहे. तुमसर शहरातील आंबेडकर नगरात बाबासाहेबांचे भव्य स्मारकआहे. याच वास्तूत पहिल्या माळ्याचे बांधकाम नियोजित केले गेले. त्याकरिता ३० लक्ष रुपयांची तरतूद देखील करण्यात आली होती. पहिला माळा तयार होताच त्यात अत्याधुनिक वाचनालयाची संकल्पना पडोळे यांनी कृतीतून पूर्णत्वास आणली आहे. येथे दीड कोटी रुपये खर्चून वाचनालय तसेच संपूर्ण स्मारकाला शोभिवंत करण्याचे काम पूर्ण केले गेले. तब्बल ५ विभागात मोडणारी वास्तू विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. सदर वाचनालयात प्रोजेक्टर हॉल, संगणक लॅब, कमिटी चेंबर, बैठक भवनसह प्रशिक्षणार्थ्यांकरीता भव्य वाचन कक्षाचे नियोजन केले आहे. येथे पुस्तकांचा मुबलक संग्रह करण्याकरिता मोठ्या अलमाºया, बसण्याकरीता टप्प्यानिहाय गोलाकार रचना वाचनालयाची भव्यता चित्रित करते. लवकरच ह्या वाचनालयाचे लोकार्पण पार पडणार आहे. ज्याचा नेमका फायदा संपूर्ण शहराला होईल अशी अपेक्षा पडोळे यांनी व्यक्त केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *