भाच्याने केली मामाची हत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : दारूच्या नशेत भाच्याने मामाची हत्या केल्याची घटना भंडारा तालुक्यातील अजिमाबाद येथे रविवारी रात्री घडली. राजू मनहारे (३३) असे मृतकाचे नाव आहे. तर, सुनीलकुमार छत्तु गितलहरे (१८) असे आरोपी भाच्याचे नाव आहे. दोघेही सलोनी, जिल्हा बलोदाबाजार राज्य छत्तिसगढ येथील रहिवासी आहेत. अजिमाबाद गावाच्या शेतशिवारात विटभट्टीचा उद्योग सुरू आहे. या विटभट्टीच्या कामासाठी विटभट्टी मालकाने छत्तीसगड राज्यातील कामगार कामावर आणले होते. त्यात या मामा-भाच्याचा समावेश होता. हे दोघेही भट्टी परिसरात अन्य कामगारांसह एका झोपडीत राहत होते. रविवारी त्यांनी भट्टी मालकाकडून आठवड्याचा चुकारा (पैसे) घेतले. त्यानंतर रात्री दोघांनी येथेच्छा मद्य प्रशन केले. दारु प्यायलानंतर दोघांमध्येही वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यामुळे भाच्याने मामावर हल्ला केला. त्यानंतर मामाला मारण्यासाठी भाचा मागे धावला. यामध्ये मामा रात्रीच्या अंधारात विटांसाठी बनवलेल्या मातीच्या खड्ड्यात मामा पडला आणि त्यातच मृत्यू झाला असावा, असा संशय उपस्थितांकडून व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळतात जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय पोलिस अधीक्षक अश्र्विती राव, कारधा ठाणेदार राजेशकुमार थोरात, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत मिसाळे, सहायक पोलिस निरीक्षक ऋषिकेश चाबुकस्वार हे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भाच्याला अटक केली आहे.पुढभ्ल तपास सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.