स्थानिक हौशी कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ : आ. किशोर जोरगेवार

प्रतिनिधी चंद्रपूर : पुणे-मुंबईच्या तुलनेत विदर्भातील कलावंत कुठेही कमी नाहीत. गरज आहे ती फक्त प्रोत्साहनाची आणि हौशी कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्याची. चंद्रपुरातील अशा स्थानिक हौशी कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्याचे आश्वासन आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. चंद्रपुरातील सुमारे १०० हौशी कलावंत एकत्रित येऊन महाराष्ट्राभिमान जागविणाºया ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या कार्यक्रमाची निर्मिती करीत आहेत. या कार्यक्रमाची तालीम चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सुरू आहे.हौशी कलावंतांच्या या अभिनव उपक्रमाची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी रविवारी (ता. ५) तालमीच्या ठिकाणी भेट दिली. त्यांना बघून उपस्थित कलावंतांना सुखद धक्का बसला. आ. जोरगेवार यांनी सुमारे अर्धा तास तालीम बघितली. त्यानंतर त्यांनी कलावंतांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे संयोजक आनंद आंबेकर यांनी त्यांनाउपक्रमामागची पार्श्वभूमी विशद केली. आ. किशोर जोरगेवार यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत सर्व कलावंतांचे अभिनंदन केले. आपले कलावंत कुठेही कमी नाही. अशा कलावंतांना तालिमीसाठी जागा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळवून देण्याची जबाबदारी आपण स्वीकारतो, असे म्हणत २१ ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणाºया क्रीडा महोत्सवात ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा प्रयोग सादर करण्यासाठी आमंत्रण दिले. यासोबतच या निर्मितीसाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी नगरसेवक संजय वैद्य, ज्येष्ठ कलावंत सुशील सहारे, राजेश सोनटक्के आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना सत्यात उतरविणारे नंदराज जीवनकर, प्रकाश ठाकरे, प्रज्ञा जीवनकर, मृणालिनी खाडीलकर, अविनाश दोरखंडे, चंद्रकांत पतरंगे, रवींद्र धकाते, फैय्याज शेख, महेश काहीलकर, शिरीष आंबेकर, सूरज गुंडावार, सागर जोगी, पराग मून, गोलू बाराहाते, छोटू सोमलकर, महेंद्र राळे, सुरेश गारघाटे, सीमा टेकाड़े, राणी मून, दीपक लडके, सुकेशिनी खाडीलकर, कीर्ती नगराळे, माधुरी बोरीकर, भरती जिराफे आदींनी आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वागत केले आणि आभार मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *