रानटी हत्तीने शेतकºयाला पायाखाली चिरडले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात ठाण मांडून असलेल्या रानटी हत्तींचा उपद्रव पुन्हा सुरु झाला आहे. तेलंगणात दोन शेतकºयांचे बळी घेऊन परतलेल्या रानटी हत्तीने २५ एप्रिलला दुपारी चार वाजता भामरागडच्या कियर जंगलात एका शेतकºयांस पायाखाली चिरडले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गोंगलू रामा तेलामी (४६,रा. कियर ता. भामरागड) असे मृत शेतकºयाचे नाव आहे. दोन आठवड्यांपूर्वी प्राणहिता नदी ओलांडून रानटी हत्तीने तेलंगणात प्रवेश केला होता. सीमावर्ती भागात धुडगूस घालत या हत्तीने दोन शेतकºयांचा बळी घेतला होता. त्यानंतर तो पुन्हा गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीत परतला होता. या हत्तीने बल्लाळम येथील घनदाट जंगलात ठाण मांडल्यानंतर २४ एप्रिल रोजी रात्रीपासून आपला मोर्चा कियर जंगलाकडे वळवला. दरम्यान, वनविभागाला माहितीमिळताच त्यांची एक चमू त्याठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत असताना गोंगलू तेलामी यांनी मागच्या बाजूने हत्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी रानटी हत्तीने त्यांना सोंडेने उचलून जमिनीवर आदळले व त्यानंतर पायाखाली चिरडले. यात त्यांचे शरीर छिनविछिन्न झाले. या घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाºयांनीही घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांचीही मोठी गर्दी झाली आहे. हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *