न्यायाधीशांना धमकी देणाºया पोलीस निरीक्षकास अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाथाबुक्क्या व बुटाने मारहाण गडचिरोली: विरोधात आदेश देणाºया न्यायाधीशांना घरी जाऊन धमकावल्याच्या प्रकरणात वादग्रस्त पोलीस निरीक्षक राजेश खांडवेला अखेर पोलिसांनी अटक केली. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची चंद्रपूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. चामोर्शी बाजार समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत २० एप्रिल रोजी पहाटे ठाण्यात बोलावून केल्याचा दावा सभापती अतुल गण्यारपवार यांनी पोलीस निरीक्षक राजेश खांडवेवर केला होता.

खांडवेवर गुन्हा नोंदविण्यासह बडतर्फीच्या कारवाईसाठी चामोर्शीत आंदोलन झाले होते. त्यानंतर गण्यारपवारांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाद मागितली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी २० मे रोजी राजेश खांडवेवर कलम २९४, ३२४, ३२६, ३४२ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. दरम्यान, २५ मे रोजी सकाळी खांडवे हा न्या. मेश्राम यांच्या निवासस्थानी गेला. माझ्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचा आदेश का दिला, अशी विचारणा केली. त्यावर समजावण्याचा प्रयत्न केला. आपिलात जाण्याची संधी आहे, असे न्या. मेश्राम यांनी समजावले. मात्र,त्यानंतर खांडवेने हुज्जत घालून धमकावल्याप्रकरणी पो. नि. खांडवेविरुध्द कलम ३२३, ३५३, ४५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

तडकाफडकी निलंबन

या घटनेनंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी तातडीने वेगवान हालचाली केल्या. न्या. मेश्राम यांची गडचिरोली ठाण्यात फिर्याद नोंदवून गुन्हा चामोर्शी ठाण्यात वर्ग केला, त्यानंतर पोलीस निरीक्षक खांडवेला तडकाफडकी निलंबित करण्यात आले

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *