अलीझंझा शाळेत आला ‘क्रिकेटचा देव’…

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी चंद्रपूर : एखाद्याला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यास अनेकजण कामाच्या व्यापात विसरून जातात. सेलिब्रेटीच्या बाबतीत हा प्रकार नेहमीच होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे.  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अलीझंझा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके आणि स्कूल बॅग भेट स्वरूपात देण्याचे अभिवचन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व पत्नी अंजली यांनी दिले होते. दोन महिन्यानंतर ताडोबातील अलीझंझा शाळेला आठवणीने भेट देताना तेंडुलकर दाम्पत्याने दिलेल्या वचनाची पूर्तता केली आहे. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूकडून ही भेट स्वीकारताना शाळेचे विद्यार्थी देखील गहिवरले.

हा भावनिक प्रसंग शुक्रवारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अलीझंझा शाळेत उपस्थित असलेल्या सर्वांनी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला. सचिन तेंडुलकर दोन महिन्यांपूर्वी २१ फेब्रुवारी रोजी पत्नी अंजली व मित्रांसमवेत ताडोबात व्याघ्र सफार-ीसाठी आला असता अलीझंझा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली होती. तेव्हा विद्यार्थ्यांनी चौथ्या वर्गाच्या मराठीच्या पुस्तकात असलेला कोलाज नावाचा धडा सचिनची बायोग्राफी वाचून दाखवली होती. स्वत:ची बायोग्राफी विद्यार्थी वाचत असताना सचिन भावूक झाला होता. तेव्हा सचिनची पत्नी डॉ. अंजली हिने शाळेतील विद्यार्थांना गणवेश, स्कूल बॅग देण्याचे कबूल केले होते. विद्यार्थ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीने शुक्रवारी दुपारी ३ वाजता अलीझंझाच्या जि. प. शाळेत सचिन व पत्नी डॉ. अंजली व मित्र यांनी दोन महिन्यानंतर भेट देत विद्यार्थ्यास स्कूल बॅग दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

सचिन विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी येणार असल्याने विद्यार्थी व शिक्षकाने शाळेत रांगोळी व फुलांनी सजवली होती. सचिन शाळेत येताच शाळेतील विद्यार्थिनी व शिक्षिका मनीषा बावणकर यांनी पारंपरिक पद्धतीने लाकडी पाटावर पाय धुतले व औक्षवण करत पुष्पगुच्छ दिले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून अलीझंझा गाव आहे. गावाची लोकसंख्या ३०० च्या घरात आहे. गेटकडे जाण्याच्या मार्गावर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत सध्या सतरा विद्यार्थी आहेत.तेंडुलकर दाम्पत्याने दिलेल्या वचनाची पूर्तता केली; ताडोबातील शाळकरी विद्यार्थ्यांना गणवेश, स्कूल बॅग व पुस्तकांची भेट दोन महिन्यानंतर ताडोबातील अलीझंझा शाळेला आठवणीने भेट देताना तेंडुलकर दाम्पत्याने दिलेल्या वचनाची पूर्तता केली आहे.

हा भावनिक प्रसंग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अलीझंझा शाळेत उपस्थित असलेल्या सर्वांनी अनुभवला. अविस्मरणीय क्षण आपल्या शाळेला सचिन तेंडुलकर भेट देऊन स्कूल बॅग देणार असल्याचे शिक्षकांच्यामार्फत विद्यार्थ्यांना सकाळी कळले होते. त्यामुळे विद्यार्थी आनंदित होते. सचिन तेंडुलकरने शाळेत प्रवेश केला तेव्हा विद्यार्थ्यांनी संवाद साधत सचिनला गराडा घातला. सचिनने प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या हाताने स्कूल बॅग दिली तेव्हा विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. सचिनने शाळेला दुसºयांदा व्हिजीट देण्याचा हा अविस्मरणीय क्षण असून शाळेच्या इतिहासात कधीही न विसरणारा क्षण असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *