ठाणे महानगरपालिका व महाप्रित यांच्यात सामंजस्य करार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : दि. १६/०२/२०२३ रोजी महाप्रित व महानगरपालिका ठाणे यांच्यामध्ये इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन, उर्जा बचत संदर्भात संयुक्त प्रकल्प राबविण्याच्या दृष्टिकोनातून झालेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. या चर्चेच्या वेळी महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बिपीन श्रीमाळी हे दृकश्राव्य यंत्रणेद्वारे उपस्थित होते.

महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर व महानगरपालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते. तसेच महाप्रितचे अधिकारी श्री. वि. ना. काळम पाटील, संचालक (संचलन), श्री. सुनील पोटे, कार्यकारी संचालक (संचलन), श्री. तेजस शिंदे, महाव्यवस्थापक (रेस्को) उपस्थित होते. सामंजस्य कराराच्या अनुषंगाने ठाणे शहराची इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशनची गरज, लागणाºया जागा व इतर अनुषांगिक सोईबाबत चर्चा करण्यात आली. तसेच उर्जा बचतीच्या अनुषंगाने ठाणे महानगर पालिकेच्या इमारतींमध्ये करावयाच्या नियोजन व उपाययोजनांबाबत संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या बाबींमुळे शहरातील नागरीकांची इलेक्ट्रीक व्हेईकल्स चार्जिंग स्टेशनची सोय लवकरात लवकर उपलब्ध होणार असून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून एक महत्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे. उर्जा बचतीच्या तंत्रज्ञानामुळे ठाणे महानगरपालिकेच्या सद्यस्थितीतील खर्चात निश्चित बचत होणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *