डिझेल पंप चोरटे गजाआड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : शेतातील पिकाला पाणी देण्याकरिता नाल्यावर लावलेला डिझेल पंप चोरी प्रकरणी गंगाझरी पोलिसांनी ५ मार्च रोजी दोन आरोपींना अटक केली.अजय साहेबराव पटले (२३ रा. केऊटोली) व आकाश सुकलाल कुंभरे (२१) वर्ष रा. ओझाटोला अशी आरोपींची नावे आहेत. तालुक्यातील ओझीटोला येथील फिर्यादी शेतकºयाने शेतातील पिकाला पाणी देण्याकरिता जवळून जाणाºया नाल्यावर मोटारपंप लावला होता. तो २७ फेब्रुवारी रोजी अज्ञात आरोपींनी चोरी केला. याप्रकरणी गंगाझरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. दरम्यान याप्रकरणी मिळालेल्या गोपनीय माहिच्या आधारे पोलिसांनी अजय पटले व आकाश कुंभरे यांना अटक केली. त्यांनी आपला गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी त्यांच्याजवळून मोटारपंप हस्तगत केला आहे. ही कारवाई सपोनि पोपट टिळेकर, पोहवा मनोहर अंबुले, सुभाष हिवरे, पोशि जितेंद्र बघेल यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *