संपाला जि.प. पदाधिकाºयांचा पाठिंबा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जुनी पेंशन योजना लागु करावी या प्रमुख मागणी संदर्भात कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा आज दुसरा दिवस असून सदर संपाला जिल्हा परिषद पदाधिकारी यांनी पाठींबा दिला असून याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांनी आंदोलनस्थळी येऊन केली. यावेळी आंदोलन मंडपात सभापती समाज कल्याण मदन रामटेके, सभापती कृषी व पशुसंवर्धन राजेश (बालु) सेलोकर, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ फेंडर, देवाभाऊ ईलमे, राजु देशब्रतार, डॉ.मनीषा निंबार्ते, आनंद मलेवार प्रामुख्याने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.