लाखांदूर मॅरेथॉन मध्ये कुडेगाव येथील पती-पत्नी ठरले विजेते

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : खासदार क्रीडा महोत्सवानिमित्त लाखांदूर येथे घेण्यात आलेल्या मॅरेथान मध्ये पुरुष गटात प्रथम तर महिला गटात द्वितीय स्थान पटकावून पतिपत्नीने बाजी मारल्याने आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. लोकसभा मतदारसंघातील खेळाडूसह नवोदित आणि उदयोन्मुख खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून खासदार क्रीडा महोत्सव २०२३ चे आयोजन केले आहे. हे या योजनेचे दुसरे वर्ष असून या क्रीडा महाकुंभात यावेळी तब्बल ११ खेळांचा समावेश करण्यात आला आहे. लाखांदूर तालुक्यातही या महोत्सव अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा १७ मार्च रोजी शुक्रवारी सकाळी आयोजीत करण्यात आली. यात तालुक्यातील युवक युवतींनी सहभाग घेऊन प्रचंड प्रतिसाद दिला. या स्पर्धेत २२० पुरुष व ५० महिला लाखांदूर येथील मॅरेथॉन मध्ये धावल्या.

येथील शिवाजी चौकात दौड स्पर्धेला खासदार सुनील मेंढे यांच्या सौभाग्यवती शुभांगी सुनील मेंढे यांनी स्पर्धकांना हिरवी झेंडी दाखवीत स्पर्धेला सुरुवात केली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष तथा नगराध्यक्ष विनोद ठाकरे, नगर पंचायत उपाध्यक्ष प्रल्हाद देशमुख, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक उइके, नगरसेवक रज्जू पठाण, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष वसंत इंचीलवार, नगरसेविका सोफिया पठाण, राहुल राऊत, तुळशीदास बुरडे, राहुल कोटरंगे, आकाश दखने, सरपंच प्रमोद प्रधान, शिवाजी देशकर, भुषण चेटुले, सरपंच हितेश देशमुख, अजय कोडापे यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या स्पर्धेत ३५ वयापुढील पुरुष गटात मिताराम रामकृष्ण बनकर कुडेगाव, द्वितीय ब्रम्हादास ठाकरे लाखांदूर तर तृतीय स्थान किशोर टेकाम यांनी पटकावला. तर १५ ते ३५ वयातील पुरुष गटात प्रथम पवन हटवार दिघोरि मोठी, द्वितिय चंद्रभोष कुंभरे, तर तृतीयस्थान भुमेश्र्वर लोहारे, दांडेगाव यांनी पटकाविला. ३५ वयापुढील महिला गटात प्रथम माधुरी तोंडारे, द्वितीय नलू मीताराम बनकर कूडेगाव, तर तृतीय निता धनराज मोहूर्ले लाखांदूर, चतुर्थ सोनाली सुरेश सौदरकर तर पाचवेस्थान अस्मिता सुरेश नंदागावळी यांनी पटकाविले. १५ ते ३५ वयातील महिला गटात प्रथम साहीली उद्धव रोकडे दोघोरी मोठी, द्वितीय प्राजक्ता प्रेमदास दरवरे मांधळ, तर तृतीय स्थान किरण अशोक गेडाम सोनी यांनी पटकाविला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *