धान उत्पादक शेतकºयांना १५००० रुपये प्रोत्साहन राशी त्वरीत द्यावी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : धान उत्पादक शेतकºयांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले १५००० रुपयाची प्रोत्साहनपर राशी शेतकºयांना त्वरीत देण्यात यावी यासाठीचे निवेदन शासनाला पाठविण्यात आले आहे. अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाºयाच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवासी जिल्हाधिकारी महेश पाटील यांचे मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकºयांना पंधरा हजार रुपये प्रोत्साहन राशी देण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यामुळे शेतकरी आनंदात होते. शासनाची ही रक्कमलवकर मिळेल या आशेवर शेतकरी वाट होते परंतु शासनाने शेतकºयाची दिशाभूल करून फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या शेतकºयांनी आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची नोंदणी केली आहे अशाच शेतकºयांना पंधरा हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देण्यात येणार आहे.
त्यामुळे हजारो धान उत्पादक शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार आहेत. अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, उपाध्यक्ष कोठीराम पवनकर, कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, सचिव पुरुषोत्तम गायधने, मोहन गायधने, सुरज परदेशी, दीपक वाघमारे यांनी शासनाला निवेदन पाठवून ज्या शेतकºयांनी आधारभूत केंद्रावर नोंदणी केली नाही अशा सर्व धान उत्पादक शेतकºयांनाही सरसकट १५००० रुपये देण्यात यावे अशी मागणी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.