राज्यात ‘सुंदर माझा दवाखाना’ उपक्रम सुरू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक विविध योजना राबविल्या जात आहेत, असे सांगत जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. शुक्रवारीपासून राज्यात आठवडाभर सुंदर माझा दवाखाना हा उपक्रम सुरू होत असून, सामान्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, राज्यात आरोग्याच्या क्षेत्रात आमूलागह्य बदल घडवून आणण्याच्या दिशेने आम्ही पावले टाकली आहेत. राज्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ह्यवंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्याह्ण माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुंबईमध्येदेखील सुमारे १६० हून अधिक आपला दवाखाना सुरूझाले आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात आरोग्याचा प्रकाश आणला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत गेल्या नऊ महिन्यांत ६२००० रुग्णांना एकूण ५० कोटी ५५ लाख रुपयांची मदत दिली आहे. ह्यमाता सुरक्षित तर घर सुरक्षितह्ण अभियानात चार कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार करण्यात आले.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत विमा संरक्षण दीड लाखांवरून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे आता पाच लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार आहे. शिवाय, या योजनेत नवीन २०० रुग्णालयांचा समावेश करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. समान आरोग्य सेवा हे यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य आहे. शासकीय रुग्णालये आणि आरोग्य संस्थांमध्ये सर्वांना समान सुविधा उपलब्ध करून जास्तीत जास्त रुग्णांनी सार्वजनिक रुग्णालयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने यानिमित्त यावर्षी राज्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छता मोहीम राबवत ७ ते १४ एप्रिलदरम्यान ‘Sunder Maja
Dawakhana ह्यसुंदर माझा दवाखानाह्ण हा उपक्रम राज्यभर राबविणार आहे. त्या माध्यमातून सामान्यांना आरोग्याच्या दजेर्दार सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *