मध्यप्रदेशातील लम्पी रोगाने ग्रस्त गुरे देव्हाडा बाजारात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथे बुधवारला भरणाºया आठवडी गुरे बाजारात मध्यप्रदेश मधील लम्पी रोगाने ग्रस्त गुरे मोठ्या प्रमाणात येत असून लंपी वायरस सोबत घेऊन येऊ लागल्याने निलज (बूज) गावात या रोगाची साथ सुरू झाली आहे. त्यामुळे पशु पालकात भीतीचे वातावरण पसरले आहे . मोहाडी तालुक्यातील देव्हाडा, तुमसर तालुक्यातील सिहोरा, तिरोडा तालुक्यातील महालगाव (मुरदाडा) हे बैल बाजार मोठया प्रमाणात प्रसिद्ध असून हे बाजार मध्यप्रदेश व छत्तीसगडला लागून आहेत. या बाजारात दोन्ही राज्यातून मोठया प्रमाणात जनावरे विक्रीसाठी येतात आणि लाखो रुपयाचीउलाढाल होते. आता शेतीचा हंगाम येणार असल्याने शेतकरी मोठया प्रमाणात बैलजोड्या खरेदी करीत आहेत.

मध्यप्रदेश व छत्तीसगढ येथील व्यापारी, दलाल हे लम्पी रोगाने ग्रस्त गुरे बाजारात विक्रीसाठी घेऊन येत आहेत. हे रोगग्रस्त जनावरे कमी किंमतीत मिळत असल्याने शेतकरीही ती जनावरे खरेदी करीत आहेत. त्यामुळे त्या रोगग्रस्त गुरांचे रोग गावात ईतर गुरांमध्ये पसरत असून निलज (बुज) व ईतरही गावामध्ये या रोगाने गुरांना ग्रासले असून यावर आवर घालावा, अशी मागणी काही शेतकºयांकडून होत आहे.

जनावरांमध्ये पुन्हा लंपी सदृश्य आजाराची लक्षणे; पशुपालकांमध्ये भिती तुमसर : तालुक्यातील सिहोरा, बपेरा परिसरातील जनावरांना लंपी आजाराची लक्षणे दिसून आली असल्याने पशुपालक व शेतकºयांमध्ये भिती निर्माण झाली आहे. शेजारी असणा-या मध्यप्रदेशातील गावात जनावरांना लंपी आजाराचा प्रादूर्भाव झाला असल्याचे सांगितले जात आहे. त्याचा शिरकाव सीमावर्ती भागात होत आहे. दरम्यान लंपी आजारापासून घाबरण्याची गरज नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले असून जनावरांना लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मागील वर्षी लंपी आजाराचा भंडारा जिल्ह्यात प्रादुर्भाव झाल्यानंतर प्रशासनाने जनावरांचे बाजार बंद केले होते.

या आजारावर अंकुश लावण्यासाठी युद्धस्तरावर लसीकरण करण्यात आले. लंपी आजाराची लक्षणे कमी झाल्याने जनावरे खरेदी विक्रीच्या बाजारांना मंजुरी देण्यात आली आहे. अटी व शर्तीच्या अधीन राहून ही मंजुरी देण्यात आली. अद्यापतरी येथील मवेशी बाजारात लंपी आजाराने ग्रस्त जनावरे दिसून आली नाहीत. दरम्यान सिहोरा परिसरातील गावात लंपी सदृश्य आजाराची लक्षणे असणारी जनावरे आढळली आहेत. यामुळे पशुपालक व शेतकºयांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. सिहोरा गावातील पंकज शुक्ला यांच्या घरी असणाºया गाईला लंपी सदृश्य आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. यामुळे त्यांनी काही पशु चिकित्सकांकडून गायीवर उपचार करण्याचा प्रयत्न केला आहे.

शेजारी असणाºया मध्यप्रदेशातील काही गावात जनावरांना लंपी आजाराने ग्रासले असल्याचे खाजगी पशुचिकित्साकांनी माहिती दिली. तर भंडारा जिल्ह्यातीन जनावरांना लसीकरण करण्यात आल्यानंतर आंतरराज्य सीमा मोकाट करण्यात आलेल्या आहेत. जनावरे आयात-निर्यातीवरील निर्बंध हटविण्यात आल्यामुळे मध्यप्रदेशातील जनावरे विक्रीसाठी लगतच्या सिहोरा बाजारात आणली जात आहेत. यातून पुन्हा लंपीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *