लाखनी येथे ग्रंथपालाची सभा संपन्न

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शिक्षक -शिक्षकेतर ग्रंथपाल संघटना महाराष्ट्र राज्य अंतर्गत लाखनी, जिल्हा भंडारा येथे नागपूर-भंडारा-गोदिंया जिल्हा अंतर्गत सर्व अर्धवेळ ग्रंथपालांची सहविचार सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्यात सर्वप्रथम संघटनेतील अध्यक्ष सुरेश रोखडे, सचिव चंद्रशेखर सावंत, संघटनेतील खजिनदार प्रवीण धुमाळ, व संघटक सतिश साठे आणि विदर्भ विभाग प्रमुख जगदिश टेभूर्णे या सर्वांचे आभार वेक्त करुन अभिनंदन केले. व कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मार्ल्यापण व दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. अर्धवेळ ग्रंथपालांना न्याय देण्यासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत केली असे नंदुभाऊ चौधरी, व जगदीश टेभूर्णे यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करुन त्यांनी केलेल्या कामाचा गौरव करून सर्वांनी यांच अभिनंदन केले.

सहविचार सभेचे अध्यक्षस्थानी नंदलाल चौधरी, तर प्रमुख अतिथी म्हणून जगदीश टेभूर्णे, डॉ.विनोद नागदेवते, नागपूर जिल्हा प्रमुख सुरेश नागदेवे, गोंदिया जिल्हा संघटक, रमेश लाडे गोंदिया जिल्हा प्रमुख आणि भंडारा जिल्हातील संघटक म्हणून काम करणारे राजेश पारधीकर आदी उपस्थित होते. टेभूर्णे, पारधीकर, नागदेवते यांनी सर्वांनी नुकत्याच निघालेल्या शासन आदेशाप्रती सर्वांमध्ये झालेला सभ्रंम दुर केला असून नियोजित कार्यवाही कशी आहे, हे स्पस्ट केले. त्याकरिता आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज कशी आहे हे उपस्थितांना समजावून सांगण्यात आले. उत्तम चौधरी ग्रंथपाल गां.वि.पहेला यांनी सुत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन ब्रम्हानंद खंडाईत यांनी केले, तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश बोदरे यांनी मोलाचे सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.