नोटीस नाही, आता ‘ऑन द स्पॉट पोस्टमार्टम’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : पक्षाहून कुणीही मोठा नाही. महापालिका निवडणुकीत विरोधी कारवाया करणा-यांचे ‘ऑन द स्पॉट पोस्टमार्टम’ करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. यावेळी बोलताना पटोले यांनी पक्ष- विरोधी कारवाया करणारे आणि पक्षाच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवणा-यांना खडेबोल सुनावले. गेल्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया करण्यात आला. यावेळी नोटीस आणि इतर प्रक्रिया नकरता तिथल्या तिथे कारवाई केली जाईल. भाजपला मदत करणा-यांचाही तडकाफडकी निर्णय घेण्यात येईल. पक्षाच्या बैठकांना आलेच पाहिजे. जे येत नसेल त्यांचाही लगेच हिशेब केला जाईल, अशी तंबी पटोले यांनी दिली.

केंद्र आणि राज्यात लोकशाही नसल्यासारखी स्थिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पराभवाच्या धास्तीने सरकार वर्षभरापासून निवडणुका टाळत आहे, असा आरोप करून पटोले म्हणाले, ‘निवडणुका केव्हाही झाल्या तरी त्यासाठी आतापासून सज्ज राहा. जनतेशी संपर्क तोडू नका. नंतर पश्चाताप करण्यात अर्थ नाही. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष अशा कुठल्याही पदाची अपेक्षा न करता स्वातंत्र्यलढ्याप्रमाणे काम करा. प्रभागातील प्रत्येका घरापर्यंत पोहोचा. जनतेचा आवाज व्हा. ब्लॉकसोबतच आली. हा सर्व जनतेचा पैसा असून पाकिटमाराप्रमाणे खिसा कापण्याचे काम भाजपकडून केले जात आहे, असा आरोपही पटोले यांनी केला. सार्वजनिक नळ बंद करण्याचे धोरण स्वीकारून सर्वसामान्यांच्या तोंडाचे पाणी हिसकावण्याचे काम भाजपने केले आहे. यावर मोठे आंदोलन करा, अशी सूचनाही त्यांनी केली. बैठकीस माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, तानाजी वनवे, नरेंद्र जिचकार, प्रफुल्ल गुडधे यांच्यासह त्यांच्या समर्थक पदाधिका-यांनी पाठ फिरवली.

बैठकीस आमदार अ‍ॅड. अभिजित वंजारी, संदेश सिंगलकर, पुरुषोत्तम हजारे, दिनेश बानाबाकोडे, गजराज हटेवार, बंडोपंत टेंभुर्णे, रमण पैगवार, नॅश अली आदी उपस्थित होते. प्रत्यक्ष मैदानात उतरा! ‘राहुल गांधी आगे बढो, अशा घोषणा देऊन चालणार नाही. प्रत्यक्ष प्रभाग अध्यक्षही नियुक्त केले जाईल’, मैदानात उतरावे लागेल. पटोले आले असेही त्यांनी खडसावून सांगितले. जी-२० परिषदेवर हजार कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात शंभर कोटीही खर्च झाले नसतील. वीज चोरून रोशणाई करण्यात म्हणून गर्दी दिसते, एरवी अनेक पदाधिकारी पाठ फिरवतात. महापालिकेसाठी एबी फॉर्म देवडिया भवनातूनच वाटप केले जातात’, असा इशारा विलास मुत्तेमवार यांनी दिला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *