चला जाणुया नदीला नदी संवाद यात्रा संपन्न

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ‘चला जाणुया नदीला’ या उपक्रमा अंतर्गत सोमवार रोजी ग्रामपंचायत मांडवी, खमारी (बुटी), कारधा, मकरधोकडा, मौदी (पुनर्वसन) येथे चला जाणूया नदीला अभियान अंतर्गत ‘नदी संवाद यात्रा’ आयोजित करण्यात आली. यावेळी जनजागृती कार्यक्रम व नदीचे महत्व पटवून देणारे पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी जिल्हा नदी समन्वय समितीतर्फे नदी समन्वयक शाहिद खान, अविल बोरकर व दिलीप पंढरे उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाच्या उद्देश व रूपरेषा गावकºयांना समजावून सांगितले. तसेच त्यांना प्रतिसाद देण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्राम पंचायत पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, तहसीलदार अरविंद हिंगे, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजुरकर, सह. गट विकास अधिकारी सिंगनजुडे व माजी सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य, वनरक्षक, वन कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक व गावकरी आदी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.