भारतामधल्या तंत्रज्ञान क्षेत्रामधील राजीव गांधींचे योगदान खूप महत्त्वाचे आहे – डॉ. नितीन राऊत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी भारताचे नववे पंतप्रधान होते. भारताचे पहिले तरुण पंतप्रधान राजीव गांधी होते, ज्यांनी वयाच्या ४० व्या वर्षी पदभार स्वीकारला. त्यांनी देशाला आधुनिक युगात नेले. भारतामधल्या तंत्रज्ञान क्षेत्रामधील राजीव गांधींचे योगदान खूप महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन आज काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व राज्याचे माजीमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. आज सकाळी बेझनबाग येथील जनसंपर्क कार्यालयात दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून डॉ. राऊत यांनी अभिवादन केले.                                 यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे महासचिव संजय दुबे व नागपूर शहर काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष बंडोपंत टेम्भूर्णे, ठाकुर जग्याशी, सुरेश पाटिल, विनोद राऊतप्रामुख्याने उपस्थित होते. २१ मे हा दिवस संपूर्ण देशात दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो. राजीव गांधी यांनी दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, पंचायतराज यासहीत इतर अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे.

त्यांनी भारताचे नववे पंतप्रधान म्हणून काम केले. राऊत म्हणालेत. प्रसंगी हरिभाऊ किरपाने, गीता श्रीवास, दीपक खोब्रागडे, सतीश पाली, गौतम अंबादे, शिलज पांडे, प्रकाश नांदगावे, इंद्रपाल वाघमारे, रेखा लांजेवार, संगीता टेम्भूर्णे, सुनंदा राऊत, वीना दरवाड़े, डायना लिंगेकर, रेशमा नंदागवळी, सप्तऋषी राजीवजी एक अत्यंत समजूतदार तरुणाचे विचार होते. त्यातून भारतासाठी अभिनव कल्पना निर्माण झाली, असे ही यावेळी डॉ. लांजेवार, पलाश लिंगायत, विलेश हुमने सह उत्तर नागपूर काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *