महाराष्ट्रात दहा जूनला पावसाचे आगमन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : मान्सून सक्रिय झाला असून तो आज केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे. अंदामानमध्ये तो बराच काळ रेंगाळला होता. आता मात्र त्याने वेग पकडलाय. मान्सून नैऋत्येकडे वेगाने सरकत असल्यानेआजच तो केरळच्या किनारपट्टीला धडक देऊ शकतो. भारतीय हवामान खात्याने चार जूनला मान्सून येईल, असा अंदाज दिला होता. तो अचूक ठरण्याची शक्यता आहे. सक्रीय झालेला मान्सून मालदीव समुद्रातून अरबी समुद्रात दाखल झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मान्सून आज केरळात दाखल झाल्यास कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्टीवर जोरदार पूर्वमान्सून सरी कोसळतील. महाराष्ट्रात दहा जूनला पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. राज्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभगाने वर्तविली आहे. राज्यात जून, जुलैमध्ये कमी पाऊस, तर आॅगस्ट महिन्यात साधारण पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *