महानिर्मिती भुसावळ ६६० मेगावाट प्रकल्प आॅक्टोंबरमध्ये कार्यान्वित करण्यासाठी मेसर्स भेल चे युद्धस्तरीय प्रयत्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महानिर्मितीच्या भुसावळ ६६० मेगावाट संच क्रमांक ६ चे अभियांत्रिकी, खरेदी आणि उभारणीचे काम केंद्र शासनाचा सार्वजनिक उपक्रम मेसर्स भेल कंपनी करीत असून या कामांना अधिक जलद गतीने पूर्णत्वाकडे नेण्यासाठी महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी. अनबलगन यांनी आज दिल्ली येथे भेल कंपनीचे सी.एम.डी. डॉ.नलिन शिंघल यांची भेट घेतली. महानिर्मितीच्या भुसावळ संचाचे बाष्पक प्रदीपन ३० मार्च २०२३ रोजी संपन्न झाले, त्यानंतर सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून हा संच माहे आॅक्टोबर २०२३ मध्ये कार्यान्वित करण्यासाठी मेसर्स भेल चे युद्धस्तरीय प्रयत्न सुरू असल्याचे डॉ.नलिन शिंघल यांनी सांगितले. मेसर्स भेल आणि महानिर्मिती अधिकाºयांच्या संयुक्त बैठकित भुसावळ वीज प्रकल्पाच्या विकास कामांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.

तसेच भविष्यातील वीज प्रकल्प, विद्युत उत्पादन क्षेत्रातील नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान, बदलते निकष, पर्यावरणीय ºहास आणि घडामोडी अश्या ज्वलंत विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यासंदर्भात मेसर्स भेल कंपनीने घेतलेल्या पुढाकाराबद्दल डॉ.पी.अनबलगन यांनी भेल कंपनीच्या अधिकाºयांचे कौतुक केले. महानिर्मिती आणि मेसर्स भेल कंपनी यांचे मागील चार दशकांपासून असलेले सौहार्दपूर्ण संबंध लक्षात घेता आवश्यक ते संपूर्ण सहकार्य महानिर्मितीकडून भेल कंपनीला करण्यात येईल असे डॉ.पी.अनबलगन यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या वीज क्षेत्राच्या दृष्टिकोनातून भुसावळ ६६० मेगावाट हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प असून यावर्षी राज्याच्या ग्रीडमध्ये ६६० मेगावाटची भर पडणार आहे. भुसावळ मधील ६६० मेगावाट क्षमतेचा पहिला आणि कोराडीच्या ३ संचांनंतर हा महानिर्मितीचा चवथा संच आहे. या प्रसंगी महानिर्मितीचे संचालक (प्रकल्प), अभय हरणे, मरावीम सूत्रधारी कंपनीचे निवासी कार्यकारी संचालक प्रफुल्ल पाठक तसेच भेलचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.