यवतमाळातील जोडी झाली विदर्भात ‘व्हायरल’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी यवतमाळ : वैभव नाईक आणि प्राची गायकवाड या दोघांची जोडी सध्या इंस्टाग्राम, फेसबुकवर संपूर्ण विदर्भात व्हायरल होत आहे. हे दोघेही नवराबायकोमध्ये घडणारे वेगळे-वेगळे किस्सांचे व्हिडीओ तयार करतात तसेच कॉमेडी किस्से करतात. या दोघांनी सध्या सोशल मिडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. वैभव नाईक आणि प्राची गायकवाडयवतमाळ शहरातील रहिवासी आहे. वैभवच्या वाट्याला लहानपणापासून खूप कष्ट आले. यातूनही त्यांनी मोबाईलवर शूटिंग करून तो निखळ विनोदी व्हिडिओ टाकत होता. त्यानंतर प्राची व त्यांनी एक आयडी सुरू करून सोबत जोडीनी पहिला कॉमेडी व्हिडिओ टाकला. लोकांना त्यांची जोडी खूप आवडली.

दोघांचा पहिला व्हिडिओ तीस लाखांवर पोहोचला. आज त्यांचा दोघांचे दीड लाख फॉलवर्स आहेत. वैभवचे वडील पांडुरंग नाईक घरी किराणा दुकान चालवतात त्याची आई गृहिणी आहे. वैभव व प्राची हे दोघेही विविध विषयांवर व्हिडीओ तयार करुन सोशल मिडियावर टाकतात. यामुळे प्रेक्षकांना खळखळून हसवतात वैभव आणि प्राची साध्या पेहरावात आणि मोबाईलने शूट करीत अनेकानेक व्हिडिओ बनवतात या दोघांना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.